भारत आणि पाकिस्तानदरम्यान आज आशिया चषक स्पर्धेत रंगलेल्या सुपर फोरच्या सामन्यामध्ये भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीला हरवलेली लय गवसल्याचं दिसून आलं. सामन्याच्या सुरुवातीला के. एल. राहुल आणि रोहित शर्माने दमदार सुरुवात केल्यानंतर वन डाऊन आलेल्या विराट कोहलीने भन्नाट फलंदाजी केली. सहाव्या षटकाला मैदानात उतरलेला विराट अगदी दोन चेंडू शिल्लक असेपर्यंत मैदानात तग धरुन होता. विराटने ४४ चेंडूंमध्ये ६० धावांची खेळी केली. मात्र या खेळीमध्ये सर्वात लक्षात राहण्यासारखा क्षण ठरला तो म्हणजे विराटने मारलेला एकमेव षटकार. विराटने ४७ धावांवर असताना लगावलेला षटका हा डोळ्यांचं पारणं फेडणारा होता असं म्हटल्यास अतिशयोक्ती ठरणार नाही. विराटच्या याच खेळीमुळे सोशल नेटवर्किंगवर किंग कोहली हा हॅशटॅग टॉप ट्रेण्डमध्ये दिसून आला.
नक्की पाहा >> Video: पाकविरुद्धच्या सामन्यात सुमार कामगिरी करणाऱ्या पंत, पंड्यावर कर्णधार रोहित भडकला; ड्रेसिंग रुममध्ये दोघांना झापलं
IND vs PAK Asia Cup: नाद करा पण विराटचा कुठं! खणखणीत षटकार लगावत साजरं केलं अर्धशतकं; Video झाला Viral
विराटने आपल्या खेळीत चार चौकार आणि हा एकमेव षटकार लगावला.
Written by लोकसत्ता ऑनलाइन
Updated:
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 04-09-2022 at 21:56 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Video ind vs pak asia cup 2022 india vs pakistan virat kohli 50 with six king kohli trends on twitter scsg