WTC 2023 Final India vs Australia: भारत विरुद्ध वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलच्या तिसर्‍या दिवशी ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या डावात ४ बाद १२३ धावा केल्या. ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात ४६९ धावा केल्या, त्याला प्रत्युत्तरात भारताचा डाव २९६ धावांवर आटोपला. दिवसाचा खेळ संपला तेव्हा मार्नस लाबुशेन ४१ आणि कॅमेरॉन ग्रीन सात धावांवर खेळत होते. ऑस्ट्रेलियाने आता भारतावर २९६ धावांची आघाडी घेतली आहे. ऑस्ट्रेलियाच्या दुसर्‍या डावात एक मजेदार घटना पाहण्यात मिळाली. मोहम्मद सिराजच्या एका जबरदस्त चेंडूने मार्नस लाबुशेनची झोप उडाली. डेव्हिड वॉर्नर बाद होताच त्याला पळत-पळत मैदानावर यावे लागले.

भारत २९६ धावांवर ऑल आऊट झाल्यानंतर ऑस्ट्रेलियाला १७३ धावांची आघाडी मिळाली. दुसऱ्या डावात उस्मान ख्वाजा आणि डेव्हिड वॉर्नर पुन्हा एकदा फलंदाजी करण्यासाठी खेळपट्टीवर आले. मार्नस लाबुशेन तिसऱ्या क्रमांकावर आपली फलंदाजी येण्याची वाट पाहत होता. तो पॅड-अप करून ड्रेसिंग रूमच्या बाल्कनीत आला आणि त्याने खुर्ची टाकून त्यावर शांत झोपी गेला. हे सर्व दृश्य कॅमेरामनने त्याच्या कॅमेरात कैद केले. या घटनेवर कॉमेंट्री बॉक्समध्ये बसलेले सौरव गांगुली आणि हरभजन सिंग लाबुशेनच्या झोपेबद्दल बोलत होते.

त्याचवेळी मोहम्मद सिराजच्या अफलातून चेंडूवर डेव्हिड वॉर्नर बाद झाला. जेव्हा हे मार्नस लाबुशेनला कळाले तेव्हा तो घाईघाईने उठला आणि धावतपळत फलंदाजीसाठी मैदानात आला. हा रंजक व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल होत आहे. यावर चाहत्यांनी मजेशीर कमेंट्स केल्या आहेत. ते म्हणतात की, “ लाबुशेन घोड़े बेचकर सो रहे थे क्या?”

सामन्यात ऑस्ट्रेलिया भक्कम स्थितीत

ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या डावात ४ बाद १२० धावा करून आपली स्थिती मजबूत केली. या सामन्यात टिकून राहण्यासाठी भारताला ऑस्ट्रेलियाच्या उरलेल्या सहा विकेट्स लवकर काढाव्या लागतील आणि त्यानंतर फलंदाजांकडून प्रभावी कामगिरीची अपेक्षा करावी लागेल. त्याआधी रहाणेने १२९ चेंडूंच्या खेळीत ११ चौकार आणि एक षटकार मारला. दुसरीकडे शार्दुलने १०९ चेंडूंच्या खेळीत ५१ धावांची शानदार खेळी केली त्यात त्याने ६ चौकार मारले. हे त्याचे ओव्हलच्या मैदानावर तिसरे अर्धशतक आहे.

हेही वाचा: WTC Final IND vs AUS: किती ती घाई, किमान पंचांचा निर्णय तर बघा! भर मैदानात ऑस्ट्रेलियाचा झाला पचका, पाहा Video

दुसऱ्या डावात भारतीय गोलंदाजांनी अप्रतिम गोलंदाजी केली. मोहम्मद सिराजने (४१ धावांत एक) डेव्हिड वॉर्नरला (१) बाद केल्यानंतर दुसऱ्या डावातील चौथ्या षटकात लाबुशेनला दोनदा अडचणीत आणले. दोन्ही वेळा चेंडू लाबुशेनच्या शरीराला लागला. उमेश यादवने (१/२१) उस्मान ख्वाजाला १३ धावांवर तंबूत पाठवले. पहिल्या डावातील दोन्ही शतकवीर स्मिथ आणि हेड हे मोठा शॉट खेळण्याच्या नादात झेलबाद झाले त्यांना जडेजाच्या बाद केले. भारताला सामना जिंकण्यासाठी किमान त्यांना २०० धावांच्या आत सर्वबाद करावे लागेल तरच या सामन्यात टीम इंडियाला थोडीफार विजयाची संधी मिळेल.