MS Dhoni In Chennai Video: महेंद्रसिंग धोनी चेन्नईला पोहोचला, तिथे त्याची एक झलक पाहण्यासाठी चाहते विमानतळावर उपस्थित होते. वृत्तानुसार, चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार त्याच्या प्रॉडक्शन हाऊसच्या पहिल्या चित्रपट ‘लेट्स गेट मॅरीड’ च्या ऑडिओ आणि ट्रेलर लॉन्चसाठी येथे आहे. धोनीच्या प्रोडक्शन हाऊसचा हा पहिलाच सिनेमा असेल. धोनीने तीन दिवसांपूर्वी आपला ४२वा वाढदिवस साजरा केला होता.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

धोनी चेन्नईमध्ये नव्या रुपात दिसला. धोनी विमानतळावर येतानाचा व्हिडीओ चेन्नई सुपर किंग्जच्या फॅन पेजने शेअर केला आहे. या फॅन पेजच्या माध्यमातून धोनी त्याच्या प्रोडक्शन हाऊसमध्ये बनलेल्या पहिल्या चित्रपटाच्या ऑडिओ आणि ट्रेलर लाँचसाठी चेन्नईला पोहोचल्याची माहिती देण्यात आली. विमानतळावर चाहत्यांनी धोनीचे मोठ्या थाटात स्वागत केल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे.

तीन दिवसांपूर्वी आपला वाढदिवस साजरा करणारा धोनी चेन्नई विमानतळावर नव्या लूकमध्ये दिसला. या यष्टिरक्षक फलंदाजाने लांब दाढी आणि केसांचा नवा लूक स्वीकारला आहे. सीएसकेच्या अधिकृत फॅन पेज ‘व्हिसल पोडू आर्मी’ने धोनीच्या चेन्नईमध्ये आगमनाचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये चाहते धोनी-धोनीचा जयघोष करताना दिसत आहेत. दुसरीकडे चेन्नईमध्ये काही चाहत्यांनी फुलांचा वर्षाव करून ‘थाला’चे स्वागत केले.

व्हिडीओमध्ये धोनीची पत्नी साक्षीही त्याच्यासोबत दिसल्याचे पाहायला मिळत आहे. दुसरीकडे, ट्रेलर लॉन्च बद्दल बोलायचे झाले तर, मीडिया रिपोर्ट्सनुसार, तो १० जुलै, सोमवार रोजी असेल आणि या लॉन्चमध्ये धोनीची पत्नी साक्षी देखील उपस्थित असेल. चित्रपटाबद्दल बोलायचे झाले तर हरीश कल्याण, इवाना, नाधिया, योगी बाबू आणि मिर्ची विजय हे कलाकार यात दिसणार आहेत.

हेही वाचा: IND vs WI: भारताविरुद्धच्या पहिल्या कसोटीसाठी वेस्ट इंडिजच्या संघाची घोषणा, १४० किलो वजनाच्या ‘या’ खेळाडूला मिळाले स्थान

आयपीएलच्या पुढील हंगामात खेळण्यावर प्रश्न कायम आहेत

माहितीसाठी की, धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्स २०२३ मध्ये खेळल्या गेलेल्या आयपीएल १६ मध्ये चॅम्पियन बनले होते. तेव्हापासून धोनीचा हा शेवटचा आयपीएल सीझन असल्याची अटकळ बांधली जात होती. मात्र, धोनीकडून याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. या स्पर्धेनंतर धोनीच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. धोनीने शस्त्रक्रियेनंतर चेन्नई सुपर किंग्जचे सीईओ काशी विश्वनाथन यांनी पुष्टी केली होती की तो पुनरागमन करण्यासाठी सरावला सुरूवात करत आहे. मात्र, या सर्व गोष्टींनंतरही धोनी पुढच्या हंगामात खेळेल की नाही हे सांगता येत नाही.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Video mahendra singh dhoni arrived in chennai in a new look fans showered flowers to welcome thala at the airport avw