Rehmanullah Gurbaz making fun of Rinku Singh : भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात तीन सामन्यांची टी-२० मालिका खेळवली जात आहे. टीम इंडियाने मालिकेतील पहिल्या सामन्यात शानदार विजयाची नोंद केली. आता दुसरा सामना इंदूरमध्ये होणार आहे. या सामन्यानंतरचा एक मनोरंजक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. यामध्ये अफगाणिस्तानचा खेळाडू रहमानउल्ला गुरबाज फ्लाइटमध्ये रिंकू सिंगची मस्करी करताना दिसत आहे.

कोलकाता नाईट रायडर्सने इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये टीम इंडिया आणि अफगाणिस्तानचे खेळाडू दिसत आहेत. रिंकू सिंग फ्लाइटमध्ये झोपलेला दिसत आहे. दरम्यान, अफगाणिस्तानचा खेळाडू गुरबाज त्याच्या जवळ जातो आणि बोटाने रिंकूच्या नाकाला स्पर्श करतो. रिंकूला हे जाणवताच तो अचानक झोपेतून जागा होत. यानंतर गुरबाज रिंकूच्या डोक्यावर आणि चेहऱ्यावर प्रेमाने हात फिरवतो. या व्हिडीओवर चाहत्यांच्या अनेक प्रकारच्या प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत.

Aishwarya Narkar
Video: “शेवटचे एकदा…”, ऐश्वर्या नारकर यांनी कोणासाठी शेअर केली पोस्ट?
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Vinod Kambli Emotional Statement on Sachin Tendulkar Said He Paid for My Surgeries
VIDEO: “सचिनने माझ्या शस्त्रक्रियेचा सगळा खर्च केला…”; विनोद कांबळीने भावुक होत सांगितला घटनाक्रम
Naveen Ul Haq Bowls a 13 Ball Over Including 6 Wides 1 No ball in AFG vs ZIM 1st T20I Match Watch Video
ZIM vs AFG: नवीन उल हकने टाकलं १३ चेंडूंचं षटक, ठरला संघाच्या पराभवाचं कारण, वाईड बॉलचा भडिमार; पाहा VIDEO
Nitish Rana and Ayush Badoni Engage in Heated Exchange in Delhi vs Uttar Pradesh SMAT 2024 Video
SMAT 2024: लाईव्ह सामन्यात भिडले भारताचे दोन खेळाडू, नितीश राणा युवा खेळाडूवर संतापला; नेमकं काय घडलं? पाहा VIDEO
Lakhat Ek Aamcha Dada
Video : “…तसा सूर्या तुमचा जावई”, तुळजाने केली डॅडींकडे ‘ही’ मागणी; मालिकेत पुढे काय होणार? पाहा प्रोमो
filght Footage
विमानात नको त्या अवस्थेत सापडले जोडपे! Video झाला व्हायरल, क्रू सदस्यांची चौकशी सुरू, नेटकऱ्यांचा संताप
Mohammed Siraj Travis Head fight after wicket in IND vs AUS 2nd test Video
VIDEO: सिराज आणि हेड लाईव्ह सामन्यातच भिडले, क्लीन बोल्ड झाल्याने हेड संतापला अन् सिराजनेही दाखवले डोळे

उल्लेखनीय आहे की, टी-२० मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताने अफगाणिस्तानचा ६ गडी राखून पराभव केला होता. अफगाणिस्तानने प्रथम फलंदाजी करताना १५८ धावा केल्या होत्या. अफगाणिस्तानसाठी सलामीवीर गुरबाजने २८ चेंडूंचा सामना करताना २३ धावा केल्या होत्या. त्याने दोन चौकार आणि एक षटकार लगावला. प्रत्युत्तरात टीम इंडियाने १७.३ षटकांतच लक्ष्य गाठले. भारताकडून रिंकूने ९ चेंडूंचा सामना करताना नाबाद १६ धावा केल्या. रिंकूने २ चौकार मारले होते. आता मालिकेतील दुसरा सामना इंदूरमध्ये होणार आहे. या मालिकेच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये रिंकूचे स्थान जवळपास निश्चित झाले आहे.

हेही वाचा – कोण आहे जम्मू-काश्मीरचा पॅरा क्रिकेटर आमिर हुसैन लोन? ज्याच्या व्हिडीओने सचिन तेंडुलकरही झाला प्रभावित

भारतीय संघ : रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, तिलक वर्मा, रिंकू सिंग, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, आवेश खान, कुलदीप यादव, मुकेश कुमार, जितेश शर्मा, वॉशिंग्टन सुंदर, शिवम दुबे, रवी बिश्नोई

हेही वाचा – IND vs ENG : राहुल द्रविडच्या वक्तव्यावर इशान किशनने दिली प्रतिक्रिया, VIDEO शेअर करून दिले उत्तर

अफगाणिस्तान संघ : हजरतुल्ला झाझाई, रहमानउल्ला गुरबाज (यष्टीरक्षक), इब्राहिम झाद्रान (कर्णधार), नजीबुल्ला झाद्रान, मोहम्मद नबी, अजमतुल्ला उमरझाई, मुजीब उर रहमान, शराफुद्दीन अश्रफ, कैस अहमद, नवीन-उल-हक, फजलहक फारुकी, नूर अहमद, मोहम्मद सलीम साफी, करीम जनात, इकराम अलीखिल, फरीद अहमद मलिक, रहमत शाह, गुलबदिन नायब

Story img Loader