Alex Carey catching Ben Duckett with the help of his lips: इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील ॲशेस मालिकेतील तिसरा कसोटी सामना ६ जुलैपासून हेडिंग्ले मैदानावर सुरू झाला आहे. पहिल्या दिवसाच्या खेळात चाहत्यांना प्रचंड घमासान पाहायला मिळाले. त्याचवेळी लॉर्ड्स कसोटी सामन्यात जॉनी बेअरस्टोला रनआऊट करणाऱ्या यष्टिरक्षक ॲलेक्स कॅरीने शानदार झेल घेत पुन्हा एकदा सर्वांचे लक्ष वेधले. त्याच्या या झेलचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
या सामन्यात ॲलेक्स कॅरी त्याच्या झेल पकडण्याच्या पद्धतीमुळे चर्चेत आला. बेन डकेटचा झेल टिपण्यासाठीॲलेक्स कॅरीने आपल्या ओठांचा वापर केला. ज्यामुळे त्याचा व्हिडीओ आता व्हायरल होत आहे. हा झेल पाहिल्यानंतर त्या वेळी कॉमेंट्री बॉक्समध्ये उपस्थित असलेला माजी इंग्लिश कर्णधार इऑन मॉर्गनही स्वत:ला प्रतिक्रिया देण्यापासून रोखू शकला नाही.
हेडिंग्ले कसोटीच्या पहिल्या दिवसाच्या खेळाच्या शेवटच्या सत्रात, मिचेल मार्शच्या शानदार ११८ धावांमुळे ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव २६३ धावांवर आटोपला. यानंतर फलंदाजीसाठी उतरलेल्या इंग्लंड संघाला १८ धावांवर पहिला धक्का बेन डकेटच्या रूपाने बसला, ज्याने पॅट कमिन्सच्या चेंडूवर कट ऑफ खेळण्याच्या प्रयत्नात कॅरीकडे त्याचा झेल सोपवला.
हेही वाचा – ENG vs AUS 3rd Test: ‘ऑस्ट्रेलियन लोक माझा तिरस्कार…’, शतकानंतर मिशेल मार्शचा VIDEO व्हायरल
हा झेल टिपण्यासाठी ॲलेक्स कॅरीने आपल्या ओठांचा वापर केला. वास्तविक, जेव्हा चेंडू डकेटच्या बॅटवर आदळला तेव्हा तो वरच्या दिशेने येऊ लागला. याच कारणामुळे कॅरीला कॅच पकडण्यासाठी उडी मारावी लागली. अशा स्थितीत तोल गेल्याने चेंडू त्याच्या हॅन्ड ग्लोव्हजमधून बाहेर येऊ लागला. त्यावेळी ॲलेक्स कॅरीने आपल्या ग्लोव्हज आणि ओठाने चेंडू घट्ट पडकला पडला आणि स्वतःचा समतोल साधला. त्यामुळे बेन डकेटला तंबूत परतावे लागले.
तिसऱ्या कसोटीचा पहिला दिवस कसा राहिला?
या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करण्यासाठी उतरलेला ऑस्ट्रेलियन संघ २६३ धावांवर सर्वबाद झाला. यादरम्यान इंग्लंडचा वेगवान गोलंदाज मार्क वुडने ५ विकेट्स आपल्या नावावर केल्या. याशिवाय ख्रिस वोक्सने ३ आणि स्टुअर्ट ब्रॉडने २ विकेट्स घेतल्या. त्याचवेळी, पहिल्या डावात फलंदाजीसाठी उतरलेल्या इंग्लंड संघाने पहिल्या दिवसअखेर ३ विकेट्सच्या मोबदल्यात ६८ धावा केल्या आहेत.