Andrew Balburni running out Mohammad Wasim in IRE vs UAE match: क्रिकेटमध्ये अनेक वेळा खेळाडू आपल्या संघाला विजय मिळवून देण्यासाठी खिलाडूवृत्तीची भावना विसरून प्रत्येकाला दुखावणारे, असे काहीतरी करतात.झिम्बाब्वेमध्ये खेळल्या जात असलेल्या विश्वचषक पात्रता फेरीतही असेच दृश्य पाहायला मिळाले. आयर्लंडच्या अँड्र्यू बालबर्नीने वेदनांनी ओरडत असलेला यूएईचा फलंदाज धावबाद केले. यानंतर अँड्र्यू बालबर्नीने बरीच टीका होत आहे.
सामन्यात ३४९ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना युएईचा कर्णधार आणि सलामीवीर मोहम्मद वसीमने आक्रमक क्रिकेट खेळले, पण आयर्लंडच्या कर्णधाराने हुशारीने धावबाद केल्यामुळे, युएईचा बाद होणारा पहिला खेळाडू ठरला.
मोहम्मद वसीमला दुखापत झाली –
युएईच्या डावातील आठवे षटक मार्क एडेअर टाकायला आला होता. या षटकातील दुसरा चेंडू त्याने ऑफ स्टंपच्या बाहेरील लेन्थवर टाकला, जो बचावात्मक स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न करत असलेल्या वसीमच्या हातमोजेवर जाऊन आदळला. त्यामुळे पॉइंटकडे जाणाऱ्या चेंडूकडे लक्ष न देता तो वेदना होत असल्याने क्रिझमधून बाहेर पडला. यानंतर वसीमला वेदना होत होत्या त्याने मदतीसाठी फिजिओकडे इशारा केला.
अँड्र्यू बालबर्नीने संधीचा फायदा घेतला –
मोहमंद वसीम फिजिओ येण्याची वाट पाहत होता, तेव्हा आयर्लंडच्या कर्णधाराने हुशारी दाखवली आणि लगेच चेंडू उचलला आणि फलंदाज क्रीझच्या बाहेर गेल्याने फलंदाजाच्या टोकाला थेट स्टंपवर मारन वसीमला धावबाद केले. त्यानंतर मोहमंद वसीमला पॅव्हेलियनच्या दिशेने जावे लागले. त्याने ४४ धावा केल्या होत्या आणि तो फॉर्मध्ये दिसत होता.
चाहत्यांची अँड्र्यू बालबर्नीने टीका –
कर्णधार अँड्र्यू बालबर्नीने मोहमंद वसीमला धावबाद केल्याचा व्हिडीओ आयसीसीने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. जो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. तसेच यावर चाहत्यांच्या उत्स्फूर्त प्रतिक्रिया येत आहेत. चाहते याला क्रिकेटच्या खेळभावनेच्या विरोध आहे, असे म्हणत टीका करत आहेत. त्याचबरोबर अनेक चाहते मोहम्मद वसीमसाठी सहानुभूती दाखवत आहेत.
आयर्लंड संघाचा १३८ धावांनी विजय मोठा विजय –
सामन्याबद्दल बोलायचे तर, बुलावायो अॅथलेटिक क्लबमध्ये खेळल्या गेलेल्या सामन्यात आयर्लंडने प्रथम फलंदाजी करताना ४ गडी गमावून ३४९ धावा केल्या होत्या. आयरिश संघाकडून पॉल स्टर्लिंगने (१६२) शतक झळकावले. प्रत्युत्तरात विशाल लक्ष्याचा पाठलाग करताना यूएई संघ सर्व गडी गमावून केवळ २११ धावाच करू शकला. त्यामुळे आयर्लंड संघाने १३८ धावांनी विजय मिळवला. यूएईकडून मोहम्मद वसीमने सर्वाधिक धावा केल्या. त्याने ३२ चेंडूत ४५ धावांची खेळी केली.