Babar Azam taking Virat Kohli’s autograph on jersey: एकदिवसीय विश्वचषक २०२३ मध्ये भारतीय संघाने बाबर आझमच्या नेतृत्वाखालील पाकिस्तान संघाचा ७ गडी राखून पराभव केला. या सामन्यात भारतीय कर्णधार रोहित शर्माने शानदार फलंदाजी करत ६ चौकार आणि ६ षटकारांसह ८६ धावांची शानदार खेळी खेळली. पण सामना संपल्यानंतर पाकिस्तानी कर्णधार बाबर आझम किंग कोहलीचा चाहता म्हणून दिसला. सामना हरल्यानंतर बाबर आझमने विराट कोहलीकडून जर्सीवर ऑटोग्राफ घेतला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बाबर आझमच्या या कृतीचा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये बाबर आझम आणि विराट कोहली एकत्र उभे असल्याचे दिसत आहे. दरम्यान, किंग कोहलीने बाबर आझमला ऑटोग्राफ केलेली भारताची जर्सी भेट दिली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओवर चाहत्यांच्या अनेक प्रकारच्या प्रतिक्रियाही पाहायला मिळाल्या.

भारताचा पाकिस्तानवर दणदणीत विजय –

सामन्याबद्दल बोलायचे, तर अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारताचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पाकिस्तानचा संघ ४२.५ षटकांत १९१ धावांवर गारद झाला. प्रत्युत्तरात भारताने ३०.३ षटकांत ३ गडी गमावत १९२ धावा करून सामना जिंकला. टीम इंडियाने विश्वचषकाच्या इतिहासात पाकिस्तानविरुद्धची विजयी मालिका सुरू ठेवली आहे. भारताचा हा आठवा विजय आहे. कर्णधार रोहित शर्माने ८६ धावांची शानदार खेळी केली. त्याचवेळी जसप्रीत बुमराहने सात षटकात १९ धावा देत दोन बळी घेतले. त्याला सामनावीर म्हणून निवडण्यात आले.

हेही वाचा –

पाकिस्तानच्या सहा फलंदाजांना गाठता आला दुहेरी आकडा –

तत्पूर्वी, पाकिस्तानकडून कर्णधार बाबर आझमने सर्वाधिक ५० धावा केल्या. गेल्या सामन्यात शतक झळकावणाऱ्या मोहम्मद रिझवानचे यावेळी अर्धशतक हुकले. तो ४९ धावांवर पॅव्हेलियनमध्ये परतला. इमाम उल हकने ३६, अब्दुल्ला शफीकने २० आणि हसन अलीने १२ धावा केल्या. याशिवाय इतर सहा फलंदाजांना दुहेरी आकडा गाठता आला नाही. सौद शकील सहा, मोहम्मद नवाज चार, इफ्तिखार अहमद चार, शदाख खान दोन आणि हारिस रौफ दोन धावा करून बाद झाले.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Video of babar azam taking virat kohlis autograph on jersey after india vs pakistan match goes viral vbm