Bradley Currie Catch Video Viral in T20 Blast: टी-२० ब्लास्टमध्ये शुक्रवारी ससेक्स आणि हॅम्पशायर संघांत सामना खेळला गेला. या सामन्यात ससेक्स संघाने हॅम्पशायर ६ धावांनी मात केली. दरम्यान सामन्यातील एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ ब्रॅडली क्युरीने घेतलेला झेलचा आहे. ब्रॅक क्युरीने असा झेल घेतला की तुमचा स्वतःच्या डोळ्यांवर विश्वास बसणार नाही. अनेक चाहते आणि दिग्गज खेळाडू याला क्रिकेट जगतातील सर्वोत्तम झेल म्हणत आहेत. या झेलचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हॅम्पशायर लक्ष्याच्या अगदी जवळ होते –

टी-२० ब्लास्टमध्ये शुक्रवारी ससेक्स आणि हॅम्पशायर यांच्यात सामना रंगला. ससेक्सने प्रथम फलंदाजी करताना १८४ धावांचे लक्ष्य दिले होते. शेवटचे षटक टाकण्यापूर्वी हॅम्पशायर जवळ होते. शेवटच्या ११ चेंडूंमध्ये संघाला विजयासाठी २३ धावांची गरज होती. हे षटक टाकण्याची जबाबदारी टिमल मिल्सकडे होती.

ब्रॅडली क्युरीने हवेत उडी मारत पकडला झेल –

टिमलने चेंडू टाकला आणि स्ट्राईकवर उभ्या असलेल्या बेनी हॉवेलने मिड-विकेटच्या दिशेने शॉट मारला, असे वाटत होते की हा शॉट षटकारासाठी जाईल, पण त्यानंतर मैदानावर असे काही घडले, जे पाहून सर्वच चकीत झाले. कारण ब्रॅडली क्युरीने चेंडूच्या दिशेने धावत जाऊन सीमारेषेजवळ हवेत झेप घेत एका हाताने झेल घेत होता. झेल घेताच तो जमिनीवर पडला पण चेंडू त्याच्या हातातून सुटला नाही. ज्या चाहत्यांनी हा झेल पाहिला तो प्रत्येकजण चकीत झाला.

हेही वाचा – रांचीच्या रस्त्यावर एम एस धोनीचा जलवा! ‘ती’ स्पोर्ट्स कार चालवताना दिसला माही, Video होतोय व्हायरल

या झेलचा व्हिडिओ व्हायरल –

या झेलचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. दिनेश कार्तिकनेही हा व्हिडिओ शेअर करत लिहिले, ‘हा सर्वोत्तम झेल आहे. हा झेल घेण्यासाठी त्याने केलेली धावा अप्रतिम होती. क्युरीने हा झेल घेत सामन्यातील आपल्या संघाची स्थिती मजबूत केली. त्याच्या झेलमुळे ससेक्सने सहा विकेट्सने सामना जिंकला.