Video of C Sarath Kumar hitting a shot like Suryakumar Yadav has gone viral: टीएनपीएल २०२३ हंगामातील ११वा लीग सामना डिंडीगुल ड्रॅगन्स आणि चेपॉक सुपर गिलीज संघांत खेळला. या सामन्यात डिंडीगुल ड्रॅगन्स संघाने अवघ्या एका धावेने सुपर गिलीजचा पराभव केला. सामन्यात प्रथम फलंदाजी करताना डिंडीगुल संघाने ९ बाद १७० धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात चेपॉक संघाला ९ बाद १६९ धावांच करता आल्या. दरम्यान सामन्यात सी सरथ कुमारने एक शॉट खेळला, जो पाहून सूर्यकुमार यादवची आठवण झाली. ज्याचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

डिंडीगुल ड्रॅगन्स संघाकडून खेळत असलेल्या सी सरथ कुमारने त्याच्या १२व्या षटकात एक शॉट खेळला, ज्यामुळे सर्वांना सूर्यकुमार यादवची आठवण झाली. चेपॉक सुपर गिलीज संघाचा फिरकीपटू रॉकी भास्करने सरथला ऑफ-स्टंपच्या बाहेर खूप दूर चेंडू टाकला होता, जो जवळजवळ वाइड होता. सरथ कुमार हा चेंडू खेळण्यासाठी ऑफ स्टम्पच्या बाहेर गेला आणि शॉट खेळत फाइन लेगवर चेंडू सीमारेषेबाहेर पाठवला. सरथने ज्या पद्धतीने हा शॉट खेळला ते पाहून प्रत्येकजण प्रभावित झाला.

रविचंद्रन अश्विनच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या दिंडीगुल ड्रॅगन्सचा संघ एका वेळी ६३ धावांवर निम्मा संघ गारद झाला होता. सी सरथ कुमारने २१ चेंडूत २५ धावांची खेळी करत गणेशसोबत सहाव्या विकेटसाठी ६१ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली. त्यामुळे संघाला २० षटकांत ९ गडी गमावून १७० धावांपर्यंत मजल मारता आली.

हेही वाचा – Covid mRNA Vaccine: शेन वॉर्नचा मृत्यू कोरोनाच्या लसीमुळे! डॉक्टरांनी केला मोठा दावा, कोविडची लस ‘या’ संबंधित आजार वाढवते

वरुण चक्रवर्तीची शानदार गोलंदाजी –

१७१ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना चेपॉक सुपर गिलीज एका वेळी खूप मजबूत स्थितीत दिसत होते. ८७ धावांवर एन जगदीशनची विकेट पडल्याने दिंडीगुलच्या संघाला सामन्यात पुनरागमन करण्याची संधी मिळाली. यानंतर चेपॉकचा संघ ठराविक अंतराने विकेट्स गमावत राहिला आणि अखेरीस सामना एका धावेनी गमावला. चेपॉकसाठी बाबा अपराजितने ७४ धावांची इनिंग खेळली. दिंडीगुलकडून गोलंदाजीत वरुण चक्रवर्तीने तीन तर पी सरवना कुमारने दोन बळी घेतले.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Video of c sarath kumar hitting a shot like suryakumar yadav has gone viral in dgd vs csg match vbm