Cameron Green taking an amazing catch of Ben Duckett in the Ashes series: इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील अॅशेस २०२३ मधील पहिला कसोटी सामना १६ जूनपासून बर्मिंगहॅममधील एजबॅस्टन येथे खेळवला जात आहे. हा सामना आता अतिशय रोमांचक वळणावर पोहोचला आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमध्ये शुबमन गिलच्या विकेटच्या वादानंतर आता या अॅशेस मालिकेत एक नवीन प्रकरण समोर आले आहे. कॅमेरून ग्रीनने गिलचा झेल घेऊन पॅव्हेलियनमध्ये पाठवले होते, आता याच ग्रीनच्या आणखी एका झेलवर प्रश्न उपस्थित केला जात आहेत.
खरं तर, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळल्या जात असलेल्या पहिल्या कसोटीच्या तिसर्या दिवशी पावसानंतर खेळ पुन्हा सुरू झाला तेव्हा बेन डकेट स्ट्राइकवर आला. नवव्या षटकात, पॅट कमिन्सने त्याला चौथा चेंडू टाकला, तेव्हा डकेटने तो स्क्वेअर लेगच्या दिशेने स्विंग करण्याचा प्रयत्न केला, पण तो चुकला आणि चेंडू त्याच्या बॅटच्या काठावर गेला आणि गली क्षेत्ररक्षक कॅमेरॉन ग्रीनच्या दिशेने गेला. चेंडू खाली असूनही ग्रीनने झेल टिपण्यात कोणतीही चूक केली नाही. त्याने हा झेल नेत्रदीपक पद्धतीने पूर्ण करून सर्वांना थक्क केले. त्याच्या झेलचा व्हिडिओही सध्या चर्चेत आहे. ग्रीनच्या या शानदार झेलनंतर डकेट १९ धावा करून बाद झाला. पण काही चाहत्यांना वाटत होते गिलच्या झेलप्रमाणे हा झेलही पूर्ण झाला नसावा.
शुबमन गिलच्या झेलवरुन झाला होता गदारोळ –
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये शुबमन गिलचा झेलही कॅमेरून ग्रीनने स्लीपमध्ये पकडला होता. विशेष म्हणजे तो झेल डकेटसारखा क्लेअर नव्हता. चेंडू खाली जमिनीवर आदळत असल्याचे फुटेजमध्ये दिसत होते. मात्र असे असतानाही अंपायरने गिलला आऊट घोषित केले, त्यानंतर बराच गदारोळ झाला होता. यानंतर चाहते त्याला चीटर-चीटर म्हणत होते. पण कॅमेरून ग्रीनने बेन डकेटचा जो झेल पकडला तो अगदी क्लेअर होता.
हेही वाचा – Avesh Khan: हेल्मेट जमिनीवर फेकल्याच्या प्रकरणावर आवेश खानने सोडले मौन; म्हणाला, “मी हे…”
नऊ दिवसांत दुसरी वेळ –
अंपायरने हा झेल योग्य मानला आणि डकेटला १९ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतावे लागले. १० जून रोजी डब्ल्यूटीसी फायनलमध्ये शुबमन गिलचा झेल घेताना दिसले होते, तेच दृश्य होते असे चाहत्यांचे म्हणने आहे. तेव्हाही ग्रीनचा हात आणि चेंडू जमिनीला स्पर्श करताना दिसले. तरीही पंचांनी ते योग्य मानले. ग्रीनसोबत नऊ दिवसांत ही दुसरी घटना आहे. या झेलबाबत सोशल मीडिया युजर्समध्ये आऊट की नॉट आउट अशी चर्चा सुरू झाली आहे.