England team’s umbrella like fielding to get Usman Khawaja out: अॅशेस मालिकेतील २०२३ चा पहिला सामना बर्मिंगहॅम येथे खेळवला जात आहे. ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात सर्वबाद ३८३ धावा केल्या. तत्पूर्वी, इंग्लंडने पहिल्या डावात ८ बाद ३९३ धावांवर आपला डाव घोषित केला होता. ऑस्ट्रेलियाकडून उस्मान ख्वाजाने १४१ धावांची शानदार खेळी केली. त्याला ओली रॉबिन्सनने बाद केले. ओली रॉबिन्सनने उस्मानला बाद करण्यासाठी इंग्लंडने विशेष फील्ड सेटअप केले होते. त्याचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
ख्वाजाचे शतक इंग्लंडसाठी अडचणीचे ठरले होते.

खरे तर ऑस्ट्रेलियासाठी पहिल्या डावात डेव्हिड वॉर्नर आणि उस्मान ख्वाजा फलंदाजीला आले होते. यादरम्यान वॉर्नर अवघ्या ९ धावा करून बाद झाला. पण ख्वाजाने खेळपट्टीवर टिकून राहत शानदार खेळी केली. त्याने ३२१ चेंडूंचा सामना करताना १४१ धावा केल्या. ख्वाजाच्या खेळीत १४ चौकार आणि ३ षटकारांचा समावेश होता. त्याला बाद काढण्यासाठी इंग्लंडने खास प्रकारचे क्षेत्ररक्षण जाळे तयार केले होते. इंग्लंडने ख्वाजासमोर सहा क्षेत्ररक्षक छत्रीच्या आकारासारखे उभे केले होते.

IND vs ENG Pakistani Origin England Bowler Saqid Mahmood Denied Visa To India
IND vs ENG: पाकिस्तान वंशाच्या इंग्लंड खेळाडूला भारत व्हिसा नाकारला, भारत दौऱ्यात खेळू शकणार?
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Akash Deep has revealed How Virat Kohli gifted his bat that saved Gabba Test for India
Virat Kohli : ‘मी बॅट मागितली नव्हती, त्यानेच…’, गाबा कसोटी वाचवणाऱ्या आकाशदीपचा विराटच्या बॅटबद्दल मोठा खुलासा
IND vs ENG T20I Series Full Schedule Timings and Squads in Detail
IND vs ENG: भारत वि इंग्लंड टी-२० मालिकेचं संपूर्ण वेळापत्रक एकाच क्लिकवर! जाणून घ्या सामन्याची नेमकी वेळ
Heinrich Klaasen hit maximum six ball gone out of stadium video viral in SAT20 2025
SA20 2025 : हेनरिक क्लासेनने मारला गगनचुंबी षटकार! चेंडू थेट स्टेडिमयच्या बाहेर रस्त्यावर पडला, अन् चाहत्याने…
kites on Makar Sankranti
मकरसंक्रांतीला पतंग उडवितांना कुठल्या दुर्घटना घडतात माहिती आहे का?
BPL 2025 Mohammad Nawaz and Tanzim Hasan fight during Khulna Tigers vs Sylhet Strikers match
BPL 2025 : लाइव्ह मॅचमध्ये बांगलादेश आणि पाकिस्तानच्या खेळाडूंमध्ये जुंपली, वाद घालतानाचा VIDEO व्हायरल
Bumrah may lose out on Test captaincy
कसोटी कर्णधारासाठी दीर्घकालीन पर्यायाची गरज; बुमराच्या क्षमतेवरून निवड समितीमध्येच संभ्रम

उस्मान ख्वाजाला बाद करण्यासाठी लावल्या क्षेत्ररक्षणाचा ओली रॉबिनसनने अचूक फायदा घेतला. त्याने ख्वाजाला यॉर्कर लेंथचा मारा करताना क्लीन बोल्ड केले. ज्याचा व्हिडीओही व्हायरल होत आहे. उस्मान ख्वाजा सातव्या विकेटच्या रुपाने बाद झाला. यानंतर ऑस्ट्रेलियाचा संपूर्ण संघ १४ धावांत गारद झाला. ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर उस्मान ख्वाजाने अॅशेस मालिकेत शतक झळकावून संघाला बळकटी तर दिलीच पण १३९ वर्षे जुना विक्रमही केला. ख्वाजा १८८४नंतर दुसऱ्या देशात जन्मलेला आणि अॅशेसमध्ये शतक झळकावणारा पहिला ऑस्ट्रेलियन फलंदाज ठरला.

हेही वाचा – Ashes Series 2023: शतकवीर उस्मान ख्वाजाला ओली रॉबिन्सनने केले क्लीन बोल्ड, VIDEO व्हायरल

अॅशेस मालिकेत पाच कसोटी सामने खेळवले जाणार आहेत. इंग्लंडकडून जो रूट आणि ऑस्ट्रेलियाकडून उस्मान ख्वाजाने शतकी खेळी केली. ऑस्ट्रेलियाकडून पहिल्या डावात नॅथन लायनने ४ बळी घेतले. तर हेजलवूडने २ बळी घेतले. त्याचवेळी इंग्लंडकडून स्टुअर्ट ब्रॉड आणि रॉबिन्सनने ३-३ बळी घेतले. पावसामुळे या सामन्यावर मोठा परिणाम झाला. तिसऱ्या दिवशी पावसामुळे सामना दोनदा थांबवण्यात आला होता.

Story img Loader