India vs Pakistan Match, ICC World Cup 2023 Match Updates: आशिया चषक २०२३ नंतर भारत आणि पाकिस्तान पुन्हा एकदा विश्वचषक २०२३ मध्ये आमनेसामने पाहायला मिळणार आहेत. दोन्ही देशांमधला हा हाय व्होल्टेज सामना शनिवारी म्हणजेच १३ ऑक्टोबर रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर दुपारी 2 वाजल्यापासून खेळवला जाणार आहे. आशिया चषकातील पराभवाचे दु:ख विसरून पाकिस्तानचा संघ उद्या विजयाच्या इराद्याने मैदानात उतरणार आहे. त्याचबरोबर पाकिस्तानवर विजय मिळवून या स्पर्धेत प्रगती करण्याचेही भारताचे लक्ष्य असेल.
विश्वचषकात दोन्ही संघ सात वेळा आमनेसामने आले आहेत, पण पाकिस्तानला एकही सामना जिंकता आलेला नाही. या शानदार सामन्यासाठी दोन्ही संघांसोबतच त्यांचे चाहतेही सज्ज झाले आहेत. इंटरनेटवर अनेक व्हिडिओ समोर आले आहेत, ज्यामध्ये चाहते या सामन्याची तयारी करताना दिसत आहेत. आता एएनआय या वृत्तसंस्थनेही असाच एक व्हिडीओ शेअर केला आहे.
या व्हिडिओमध्ये दोन्ही संघांचे चाहते त्यांच्या शरीरावर रंग लावताना दिसत आहेत. आपल्या देशाबद्दलचे प्रेम दाखवण्यासाठी चाहत्यांनी आपल्या देशाचे राष्ट्रध्वज आपल्या अंगावर रंगवले आहेत. अशा प्रकारे दोन्ही देशांच्या चाहत्याने या सामन्यासाठी तयारी करताना दिसत आहेत.
पाकिस्तानने भारतीय भूमीवर भारताविरुद्ध जिंकलेत अधिक सामने –
भारत आणि पाकिस्तान यांच्यात भारतीय भूमीवर एकूण ३० एकदिवसीय सामने खेळले गेले आहेत. या सामन्यांमध्ये पाकिस्तान संघाने १९ सामने जिंकले आहेत, तर भारताने ११ सामने जिंकले आहेत. एकदिवसीय सामन्यांमध्ये पाकिस्तानचा भारताविरुद्धचा विक्रम भारतीय भूमीवर अधिक चांगला दिसतो.
पाकिस्तान संघाने सामन्यापूर्वी केला सराव –
पाकिस्तानचा डावखुरा फिरकीपटू मोहम्मद नवाज, लेगस्पिनर शादाब खान आणि लेगस्पिनर इफ्तिखार अहमद यांनी 14 ऑक्टोबर रोजी भारताविरुद्धच्या विश्वचषकातील महत्त्वाच्या सामन्यापूर्वी गुरुवारी ‘स्पॉट’ गोलंदाजीचा सराव केला. या तीन फिरकीपटूंनी मुख्य नेटमध्ये फलंदाजांना गोलंदाजी दिली नाही, उलट त्यांनी गोलंदाजी प्रशिक्षक मॉर्नी मॉर्केल यांच्या देखरेखीखाली ‘स्पॉट’ गोलंदाजीवर लक्ष केंद्रित केले. पूर्वी या प्रकारचा सराव केला जात असे, परंतु सध्या अशा पद्धतीचा ट्रेंड नाही.