Video of MS Dhoni’s friend’s engagement : भारतीय संघाचा माजी कर्णधार एमएस धोनी सध्या आयपीएल २०२४ च्या तयारीत व्यस्त आहे. धोनी आयपीएलच्या आगामी हंगामात चेन्नई सुपर किंग्ज (सीएरक) ची धुरा सांभाळताना दिसणार आहे, ज्याबद्दल चाहते खूप उत्सुक आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर चाहत्यांना ‘थला’ म्हणजेच धोनी या मेगा लीगमध्ये खेळताना दिसतो. त्याच्या चाहत्यांमध्ये त्याच्याबद्दल इतकी क्रेझ आहे की त्याचे फोटो आणि व्हिडिओ काही वेळातच सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनतात.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

धोनीचा असाच एक व्हिडीओ बुधवारी समोर आला आहे, ज्यामध्ये तो त्याच्या मित्राच्या साखरपुड्यात सहभागी झाल्याचा दिसत आहे. फॅमिली फंक्शन किंवा मित्राच्या लग्नात धोनी एन्जॉय करताना दिसला असेल असे फार कमी प्रसंग आले आहेत. मात्र, या व्हिडीओमध्ये धोनी चांगलाच मूडमध्ये दिसत होता. त्या जोडप्याला अंगठ्या कशा घालायच्या हेही सांगितले. यावेळी, सीएसके कर्णधाराने तपकिरी रंगाचा लांब कोट आणि काळी पँट घातली होती.

उल्लेखनीय आहे की धोनी आयपीएल २०२३ मध्ये डाव्या गुडघ्याच्या दुखापतीने खेळला होता, ज्यामुळे तो काही अडचणीत होता. मात्र, असे असतानाही त्याने एकही सामना न गमावता पाचव्यांदा आपल्या संघाला विजेतेपद मिळवून दिले. हंगाम संपल्यानंतर त्याच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया झाली आणि आता पुनर्वसन पूर्ण केल्यानंतर तो पूर्णपणे तंदुरुस्त झाला आहे. आयपीएलच्या १६ व्या मोसमात धोनीला चाहत्यांकडून भरपूर पाठिंबा मिळाला, ते पाहून त्याने स्पर्धेच्या अंतिम सामन्यानंतर चाहत्यांसाठी आणखी एक हंगाम खेळण्याचा निर्णय घेतला.

हेही वाचा – आजचा दिवस ठरला पदार्पणवीरांचा! रजत पाटीदार आणि शोएब बशीरसह ‘या’ नऊ खेळाडूंनी केले आंतरराष्ट्रीय संघात पदार्पण

आयपीएल २०२४ साठी चेन्नई सुपर किंग्जचा संघ –

महेंद्रसिंग धोनी (कर्णधार), ऋतुराज गायकवाड, डॅरिल मिशेल, अजिंक्य रहाणे, दीपक चहर, डेव्हॉन कॉनवे, मोईन अली, महिश तीक्षणा, मिचेल सँटनर, शिवम दुबे, मथिशा पाथिराना, तुषार देशपांडे, रवींद्र जडेजा, राजवर्धन हंगरगेकर, सिमरजीत सिंह, शेख रशीद, निशांत सिंधू, मुकेश चौधरी, प्रशांत सोळंकी, अजय मंडल, रचिन रवींद्र, शार्दुल ठाकूर, मुस्तफिजुर रहमान, अवनीश राव अरावली, समीर रिझवी.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Video of former indian team captain ms dhoni participating in a friends engagement has gone viral vbm