Kane Williamson and his daughter playing cricket at home: न्यूझीलंडचा स्टार फलंदाज केन विल्यमसन सध्या गुडघ्याच्या दुखापतीमुळे रिहॅब प्रक्रियेतून जात आहे. विल्यमसनला या वर्षी भारतात खेळल्या जाणार्‍या वनडे विश्वचषक २०२३ मध्ये पुनरागमन करण्याची आशा आहे. ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये वर्ल्ड कप खेळवला जाणार आहे. अशात आता सोशल मीडियावर सध्या एक व्हिडीओ वेगाने व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये न्यूझीलंड केन विल्यमसन आपल्या मुलीसोबत घरात क्रिकेट खेळताना दिसत आहे.

केन विल्यमसन आणि त्याची मुलगी क्रिकेट खेळत असलेला व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये केन विल्यमसनची मुलगी चेंडू फेकत आहे, तर न्यूझीलंडचा माजी कर्णधार फलंदाजी करताना दिसत आहे.

Aishwarya Narkar
Video: “शेवटचे एकदा…”, ऐश्वर्या नारकर यांनी कोणासाठी शेअर केली पोस्ट?
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Nitish Rana and Ayush Badoni Engage in Heated Exchange in Delhi vs Uttar Pradesh SMAT 2024 Video
SMAT 2024: लाईव्ह सामन्यात भिडले भारताचे दोन खेळाडू, नितीश राणा युवा खेळाडूवर संतापला; नेमकं काय घडलं? पाहा VIDEO
Lakhat Ek Aamcha Dada
Video : “…तसा सूर्या तुमचा जावई”, तुळजाने केली डॅडींकडे ‘ही’ मागणी; मालिकेत पुढे काय होणार? पाहा प्रोमो
Neelam Bhardwaj becomes youngest Indian woman Batter to hit List A double hundred
१३७ चेंडूत २०० धावा! भारताच्या लेकीने घडवला इतिहास; सर्वात कमी वयात द्विशतक झळकावणारी पहिली महिला फलंदाज
Shaheen Shah Afridi becomes youngest bowler to complete 100 wickets in all 3 formats
Shaheen Afridi: शाहीन शाह आफ्रिदीचा मोठा पराक्रम, क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये ‘ही’ कामगिरी करणारा सर्वात तरूण गोलंदाज
Krunal Pandya in Pushpa 2 Tarak Ponappa looks like Indian Cricketer Know The Truth Behind Viral Photos
Pushpa 2: ‘पुष्पा २’ मध्ये खलनायकाच्या भूमिकेत भारताचा क्रिकेटपटू? व्हायरल फोटोंमागचं काय आहे सत्य?
shraddha kapoor andrew garfield
बॉलीवूडची ‘स्त्री’ अन् ‘स्पायडरमॅन’ जेव्हा एकत्र येतात, श्रद्धा कपूर आणि अँड्र्यू गारफिल्डचे फोटो पाहून चाहते म्हणाले…

केन विल्यमसनचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल –

केन विल्यमसनची ही शैली सोशल मीडियावर चाहत्यांना पसंत पडत आहे. मात्र, हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. याशिवाय सोशल मीडिया यूजर्स सतत कमेंट करून आपली प्रतिक्रिया देत आहेत. सोशल मीडियावर चाहत्यांचे म्हणणे आहे की हा आजचा सर्वात सुंदर व्हिडिओ आहे.

हेही वाचा – ZIM Afro T10: झिम्बाब्वेमधील नव्या लीगला लवकरच होणार सुरुवात, पठाण ब्रदर्ससह ‘या’ भारतीय खेळाडूंचा असणार सहभाग

आयपीएल २०२३ मध्ये गुजरात टायटन्सचा भाग असलेला केन विल्यमसन या स्पर्धेतील चेन्नईविरुद्धच्या पहिल्या सामन्यात क्षेत्ररक्षण करताना जखमी झाला होता. विल्यमसनच्या गुडघ्याला दुखापत झाली होती. काही दिवसांपूर्वी न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने (ब्लॅककॅप्स) एक व्हिडीओ शेअर केला होता, ज्यामध्ये विल्यमसन त्याच्या दुखापतीबद्दल माहिती देत होता. तसेच व्हिडीओमध्ये विल्यमसन जिममध्ये व्यायाम करताना दिसला होता.

केन विल्यमसनची कारकीर्द –

दुसरीकडे, केन विल्यमसनच्या कारकिर्दीबद्दल बोलायचे, तर या खेळाडूने आतापर्यंत न्यूझीलंडकडून ९४ कसोटी सामने खेळले आहेत. याशिवाय त्याने १६१ एकदिवसीय आणि ८७ टी-२० सामन्यांमध्ये किवी संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. केन विल्यमसनने ९४ कसोटी सामन्यात ८१२४ धावा केल्या आहेत. त्याचबरोबर १६१ वनडेमध्ये ६५५५ धावा केल्या आहेत. केन विल्यमसनने ८७ टी-२० सामन्यात २४६४ धावा केल्या आहेत. तसेच केन विल्यमसनने आयपीएलमध्ये ७७ सामने खेळले आहेत.

Story img Loader