Marcus Stoinis Video Viral: ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सुरू असलेला विश्वचषक २०२३ सामना पुन्हा एकदा तिसऱ्या पंचाच्या निर्णयावरून वादात सापडला आहे. यापूर्वी स्टीव्ह स्मिथच्या डीआरएसवर प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. आता मार्कस स्टॉयनिसच्या विकेटवरही गोंधळ उडाला आहे. स्टीव्ह स्मिथ आणि फील्ड अंपायर जोएल विल्सन यांना सुरुवातीला डीआरएसच्या निर्णयावर विश्वास बसला नाही. आता स्टॉयनिसला यष्टिरक्षकाने झेलबाद दिल्याने मोठा वाद निर्माण झाला आहे. या प्रसंगी भाष्य करणाऱ्या समालोचकांचा असा विश्वास होता की मार्कस स्टॉयनिसला चुकीच्या पद्धतीने बाद देण्यात आले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काय होता संपूर्ण वाद?

वास्तविक हा संपूर्ण वाद असा होता की कागिसो रबाडा १८ व्या षटकात गोलंदाजी करत होता. ओव्हरचा दुसरा चेंडू लेग स्टंपच्या बाहेर जात होता. यादरम्यान मार्कस स्टॉयनिसचा उजवा हात बॅटमधून निघून गेला आणि चेंडू त्या हाताच्या ग्लोव्हजला लागला आणि यष्टिरक्षक क्विंटन डी कॉकच्या हातात गेला. मैदानी पंच जोएल विल्सन आणि रिचर्ड इलिंगवर्थ यांनी त्याला नाबाद घोषित केले. पण या सामन्याचे तिसरे पंच असलेल्या रिचर्ड केटलब्रोने त्याला आऊट दिले.

काय आहे नियम?

समालोचकांच्या म्हणण्यानुसार, नियमांनुसार, जर तुमचा हात तुमच्या बॅटच्या किंवा दुसऱ्या हाताच्या संपर्कात असेल आणि चेंडू आदळला, तर त्या स्थितीत तुम्हाला कॅच आऊट दिला जाऊ शकतो. पण इथे स्टॉयनिसच्या उजव्या हाताने बॅट सोडली होती आणि डाव्या हाताच्या संपर्कात नव्हता. असे असतानाही त्याला आऊट देण्यात आले. फील्ड पंच जोएल आणि रिचर्ड इलिंगवर्थ यांनाही हे मान्य नव्हते. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

हेही वाचा – AUS vs SA, World Cup 2023: ऑस्ट्रेलियन संघाची लाजिरवाणी कामगिरी, दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांचे सोडले ६ झेल

स्टॉयनिसला बसला नाही विश्वास –

या संपूर्ण घटनेनंतर मार्कस स्टॉयनिस पूर्णपणे दुःखी दिसत होता. त्याचवेळी समालोचकानीही या निर्णयावर नाराजी व्यक्त केली. ऑस्ट्रेलियाचा कोचिंग स्टाफ आणि कर्णधार पॅट कमिन्सही या निर्णयावर खूश दिसत नव्हता. अशा प्रकारे, आऊट दिल्यानंतरही स्टॉइनिस बराच वेळ पॅव्हेलियनमध्ये पॅड घालून बसून राहिला. अशा प्रकारे बाद होण्याच्या निर्णयावर त्याचा विश्वास बसत नव्हता.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Video of marcus stoinis getting out goes viral in aus vs sa match updates vbm