Matt Parkinson’s Ball of the Century Video Viral: ऑस्ट्रेलियाचा माजी दिग्गज फिरकीपटू शेन वॉर्नने इंग्लंडविरुद्ध ‘बॉल ऑफ द सेंच्युरी’ फेकण्याचा पराक्रम केला होता. आता असाच एक व्हिडीओ समोर आला आहे, ज्यामध्ये एका स्पिनरने शेन वॉर्नसारखा चेंडू टाकला आहे. या चेंडूलाही ‘बॉल ऑफ द सेंच्युरी’ म्हटले जात आहे. या व्हिडीओने सर्वांना शेन वॉर्नची आठवण करून दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

ऑस्ट्रेलियाच्या माजी दिग्गज खेळाडूने १९९३ मध्ये इंग्लंडविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात ‘बॉल ऑफ द सेंच्युरी’ टाकला होता. वॉर्नच्या चेंडूचा सामना इंग्लिश फलंदाज माईक गॅटिंगने केला होता. या चेंडूवर गॅटिंग बाद झाला होता. वॉर्नचा हा चेंडू पाहून गॅटिंग पूर्णपणे चकित झाला. काय झाले ते फलंदाजाला समजले नाही. वॉर्नचा चेंडू लेगस्टंपच्या दिशेने जाताना पाहून गॅटिंगला तो सोडायचा होता, पण चेंडूने इतके वळन घेतले की तो ऑफ स्टंपला लागला.

आता नेमका तसाच चेंडू पुन्हा पाहिला मिळला आहे. यावेळी इंग्लिश फिरकीपटू मॅट पार्किन्सनने हा चेंडू टाकला. त्याने काउंटी क्रिकेटमध्ये हा चेंडू टाकला. या चेंडूचा व्हिडीओही कौंटीच्या अधिकृत सोशल मीडियावरून शेअर करण्यात आला. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, पार्किन्सन्सचा चेंडू लेग साईडच्या बाहेर जाताना पाहून फलंदाजाला तो सोडावासा वाटला, पण चेंडू इतका टर्न झाला की, तो सरळ जाऊन ऑफ स्टंपला लागला.

हेही वाचा – ODI WC 2023: आयसीसीच्या पथकाने मोहाली स्टेडियमला ​​भेट दिली होती का? पंजाबच्या क्रीडा मंत्र्याचा बीसीसीआयला सवाल

पार्किन्सन इंग्लंडकडून तिन्ही फॉरमॅट खेळला आहे –

मॅट पार्किन्सनने तिन्ही फॉरमॅटमध्ये इंग्लंडचे प्रतिनिधित्व केले आहे. त्याने आतापर्यंत एक कसोटी, पाच एकदिवसीय आणि सहा टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. पार्किन्सनने २०१९ मध्ये आंतरराष्ट्रीय पदार्पण केले. त्याने शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना जून २०२२ मध्ये कसोटी (पदार्पण कसोटी) म्हणून खेळला. पार्किन्सनने कसोटीत एक, एकदिवसीय सामन्यात पाच आणि आंतरराष्ट्रीय टी-२० मध्ये सात विकेट्स घेतल्या आहेत.