Mitchell Starc Catch Video Viral in ENG vs AUS 2nd Test: ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात २०२३ च्या अॅशेस मालिकेतील दुसरा कसोटी सामना लॉर्ड्सवर खेळला जात आहे. या सामन्याच्या दुसऱ्या डावात इंग्लंडने चौथ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत ४ बाद ११४ धावा केल्या होत्या. संघासाठी बेन डकेटने शानदार अर्धशतक झळकावले. तो अजून आता नाबाद आहे. या सामन्यादरम्यान मिचेल स्टार्कचा एक झेल वादात सापडला होता. त्याने डकेटचा झेल घेतला. मात्र तिसऱ्या पंचाने त्याला नाबाद घोषित केले. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
चौथ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत इंग्लंडने दुसऱ्या डावात ११४ धावा केल्या होत्या. यादरम्यान बेन डकेटने ६७ चेंडूंचा सामना करत नाबाद ५० धावा केल्या. यादरम्यान डकेटने कॅमेरून ग्रीनच्या षटकात एक शॉट खेळला. त्याचवेळी स्टार्कने उडी मारून चेंडू पकडला. पण चेंडूचा जमिनीला स्पर्श झाला होता. असे असतानाही ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी मात्र बादची अपील पंचाकडे केली. यानंतर निर्णय तिसऱ्या पंचावर सोडण्यात आला. तिसऱ्या पंचाने डकेटला नाबाद घोषित केले. तिसऱ्या पंचांच्या निर्णयानंतर ऑस्ट्रेलियन कर्णधार मैदानावरील पंचांशी चर्चा करताना दिसला.
ऑस्ट्रेलियाचा संघ दुसऱ्या डावात २७९ धावांत गारद झाला. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला एकूण ३७० धावांची आघाडी मिळाली. इंग्लंडला विजयासाठी ३७१ धावांचे लक्ष्य मिळाले. या लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडने चौथ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत ४ बाद ११४ धावा केल्या होत्या. ही कसोटी जिंकण्यासाठी इंग्लंडला शेवटच्या दिवशी २५७ धावांची गरज आहे. त्याचबरोबर ऑस्ट्रेलिया संघाला विजयासाठी त्यांना फक्त ६ विकेट्सची गरज आहे.
हेही वाचा – ENG vs AUS: दुखापतग्रस्त असताना फलंदाजीला आलेल्या नॅथन लायनच्या धैर्याला सर्वांनी केला सलाम, पाहा VIDEO
विशेष म्हणजे ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात ऑलआऊट होईपर्यंत ४१६ धावा केल्या होत्या. यानंतर दुसऱ्या डावात २७९ धावा केल्या. प्रत्युत्तरात इंग्लंडने पहिल्या डावात ३२५ धावा केल्या. आता संघ दुसरा डाव खेळत आहे. त्याचबरोबर ऑस्ट्रेलियाला जिंकण्यासाठी इंग्लंडला ऑलआऊट करावे लागणार आहे. मालिकेतील पहिली कसोटी ऑस्ट्रेलियाने २ विकेट्सने जिंकली होती.