Mohammad Rizwan offering Namaz Video Viral: पाकिस्तानने आयसीसी विश्वचषक २०२३ मध्ये विजयाने आपल्या मोहिमेची सुरुवात केली आहे. हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर शुक्रवारी, ६ ऑक्टोबर रोजी झालेल्या सामन्यात नेदरलँड्सचा सहज पराभव केला. पाकिस्तानने हा सामना ८१ धावांनी जिंकला. नेदरलँड्सने गोलंदाजीत चांगली कामगिरी करत पाकिस्तानला २८६ धावांत गुंडाळले. मात्र, त्यांना फलंदाजीत विशेष काही करता आले नाही. नेदरलँडचा संघ २०५ धावांवर ऑलआऊट झाला. दरम्यान या सामन्यातील मोहम्मद रिझवानचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.

दरम्यान, व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत रिझवानने सामन्यादरम्यान नमाज अदा केल्याचा दावा केला जात आहे. मात्र, रिझवानचा मैदानावर नमाज पठण करण्याचा व्हिडिओ पहिल्यांदाच समोर आला नाही. भारताविरुद्धच्या टी-२० विश्वचषकातही रिझवान नमाज पठण करतानाचा व्हिडिओ समोर आला होता. मॅचमध्ये ड्रिंक्स ब्रेक दरम्यान रिझवानने नमाज अदा केल्याचे व्हिडिओमध्ये बोलले जात आहे. मात्र, या व्हिडिओला दुजोरा मिळालेला नाही.

Sanju Samson meets Female Fan After Match Who Injured by His Massive Six Watch Video IND vs SA
संजू सॅमसनच्या ‘त्या’ कृतीने जिंकली चाहत्यांची मनं, षटकारामुळे घायाळ झालेल्या चाहतीची घेतली भेट अन्…, पाहा VIDEO
21 November 2024 Rashi Bhavishya
२१ नोव्हेंबर पंचांग: वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग कोणत्या…
ranveer singh share joy after being father
Video : “तो क्षण जादुई…”, रणवीर सिंहने बाबा झाल्यानंतर भर कार्यक्रमात व्यक्त केल्या भावना; व्हिडीओ झाला व्हायरल
diljit dossanj back a girl who cried in concert
Video : दिलजीत दोसांझच्या कॉन्सर्टमध्ये रडल्याने तरुणी झाली ट्रोल, गायक बाजू घेत म्हणाला, “तुम्ही देशाच्या…”
Emotional message for father
“डोळ्यातले अश्रु डोळ्यांतच जिरवण्याची ताकद फक्त ‘बापाकडे’ असते” तरुणाची पाटी होतेय व्हायरल, VIDEO एकदा पाहाच
Neelam Kothari And Mahesh Thakur
“मी तिच्या अंगावर पडलो अन् नीलमने…”, अभिनेत्याने सांगितला ‘हम साथ साथ है’च्या शूटिंगचा किस्सा; म्हणाला, “त्यानंतर सलमानने…”
Video of little girl singing Yeh Raaten Yeh Mausam
“हा गोंडस आवाज तिचा नाही”? ‘ये रातें, ये मोसम’ गाणे गाणाऱ्या चिमुकलीचा Viral Video पाहून नेटकऱ्यांचा दावा, काय आहे सत्य?
anand ahuja viral video
सोनम कपूरच्या पतीचा ‘तो’ व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल; नेटकरी कौतुक करत म्हणाले, “पैसा असूनही…”

या व्हिडीओमध्ये पाकिस्तानी खेळाडू विश्रांती घेत असून रिझवान नमाज अदा करत असल्याचे दिसत आहे. त्तत्पूर्वी एक काळ असा होता की पाकिस्तानी संघ अडचणीत आला होता. त्यांच्या अव्वल क्रमांकाच्या तीन विकेट्स पडल्या असताना बोर्डावर केवळ ३८ धावा होत्या. फखर जमान, बाबर आझम आणि इमाम-उल-हक बाद झाले होते. यानंतर रिजवानने सौद शकीलच्या साथीने १२० धावांची भागीदारी केली. रिझवानने ७५ चेंडूत ६८ आणि ५२ चेंडूत ६८ धावा केल्या. सौद शकीलला त्याच्या खेळीसाठी सामनावीर म्हणून निवडण्यात आले.

मोहम्मद रिझवान आणि सौद शकीलने झळकावली अर्धशतकं –

एकदिवसीय विश्वचषकाच्या पदार्पणाच्या सामन्यात मोहम्मद रिझवान आणि सौद शकील यांनी अर्धशतकं झळकावली. विश्वचषकाच्या पदार्पणाच्या सामन्यात दोन फलंदाजांनी एकत्र अर्धशतके झळकावून एका खास क्लबमध्ये स्थान मिळवले. यापूर्वी, दोनदा पाकिस्तानच्या दोन खेळाडूंनी वनडे विश्वचषक पदार्पणाच्या एकाच सामन्यात अर्धशतकं झळकावली होती. या सामन्यात मोहम्मद रिझवान आणि सौद शकील यांनी ६८-६८ धावांची खेळी केली.

हेही वाचा – Asian Games: भारतीय पुरुष क्रिकेट संघाने पटकावले सुवर्णपदक, अफगाणिस्तानला खराब रॅकिंगचा बसला फटका

पाकिस्तानसाठी विश्वचषक पदार्पणात सर्वोच्च धावसंख्या नोंदवणारे फलंदाज –

८२ – मोहसीन खान विरुद्ध श्रीलंका, १९८३
७८* – असद शफीक विरुद्ध झिम्बाब्वे, २०११
७६ – रमीझ राजा विरुद्ध श्रीलंका, १९८७
७१ – उमर अकमल विरुद्ध केनिया, २०११
६८ – मोहम्मद रिझवान विरुद्ध नेदरलँड्स, २०२३
६८ – सौद शकील विरुद्ध नेदरलँड्स, २०२३