Ben Duckett Runout Video Viral : टीम इंडियाने राजकोट कसोटीत इंग्लंडचा ४३४ धावांनी पराभव केला. धावांच्या बाबतीत भारताचा हा सर्वात मोठा कसोटी विजय ठरला. इंग्लंडचा हा दुसरा सर्वात मोठा पराभव ठरला. या सामन्यात इंग्लंडला विजयासाठी ५५७ धावांचे लक्ष्य मिळाले होते, मात्र इंग्लंडचा दुसरा डाव अवघ्या १२२ धावांवर गारद झाला. मागील डावात १५३ धावांची खेळी करणारा बेन डकेट चार धावा काढून बाद झाला. त्याच्या धावबादचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करताना इंग्लिश संघाने पहिल्या डावात शतक झळकावणाऱ्या बेन डकेटची महत्त्वाची विकेट अवघ्या १५ धावांत गमावली. डकेटने १५ चेंडूंचा सामना करत ४ धावा केल्या होत्या. पण बेन डकेटच्या विकेटमध्ये सर्वात महत्त्वाचे योगदान ध्रुव जुरेल आणि मोहम्मद सिराज या जोडीचे होते. वास्तविक, बुमराहच्या चेंडूवर धाव घेण्याच्या प्रयत्नात बेन डकेट धावबाद झाला.

मोहम्मद सिराजचा शानदार थ्रो, अन् ध्रुव जुरेलची चपळाई –

जसप्रीत बुमराह इंग्लंडच्या डावातील सहावे षटक टाकण्यासाठी आला. ज्याच्या पहिल्या चेंडूवर, बेन डकेटने लेग साइटवर फटका मारला आणि सिंगल धाव घेण्यासाठी सहकारी खेळाडू झॅक क्रॉऊलीला कॉल केला, परंतु मोहम्मद सिराजने तत्परता दाखवत, एका हाताने चेंडू उचलला आणि चेंडू थेट यष्टिरक्षक ध्रुव जुरेलकडे फेकला. यानंतर जुरेलने अतिशय चपळाईने चेंडू स्टंपवरील बेल्स उडवल्या, ध्रुव जुरेलने बेल्स उडवल्या तोपर्यंत बेन डकेट फ्रेममध्येही आला नव्हता. त्यामुळे भारताला इंग्लंडच्या बेन डकेटच्या रूपाने पहिली विकेट मिळाली. या धावबादचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

हेही वाचा – IND vs ENG 3rd Test : इंग्लंडविरुद्धच्या ऐतिहासिक विजयानंतर भारताची डब्ल्यूटीसीच्या गुणतालिकेत मोठी झेप

बेन डकेट ठरू शकला असता धोकादायक –

राजकोट कसोटीच्या पहिल्या डावात बेन डकेटने स्फोटक फलंदाजी करत १५१ चेंडूत १५३ धावा केल्या होत्या. ज्यामध्ये त्याने २३ चौकार आणि २ षटकार मारले. त्यानंतर दुसऱ्या डावातही तो भारतीय गोलंदाजांसाठी मोठी डोकेदुखी ठरू शकला असता. मात्र मोहम्मद सिराज आणि ध्रुव जुरेलच्या उत्कृष्ट क्षेत्ररक्षणाने भारता समोरील मोठा अडथळा दूर केला. ५५७ धावांचा पाठलाग करताना इंग्लिश चाहत्यांना त्याच्याकडून मोठ्या खेळीची अपेक्षा होती, पण त्याचा सहकारी जॅक क्रॉलीच्या साथीने वेग न राखल्यामुळे त्याने महत्त्वाची विकेट गमावली. ५५७ धावांचा पाठलाग करताना इंग्लिश चाहत्यांना त्याच्याकडून मोठ्या खेळीची अपेक्षा होती, पण त्याचा सहकारी झॅक क्रॉऊलीबरोबर त्याचा ताळमेळ न बसल्यामुळे तो धावबाद झाला.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Video of mohammed siraj and dhruv jurel runout ben duckett in the second innings of the third test went viral vbm