Mohammad Siraj and Marnus Labuschagne Video Viral: जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात खेळला जात आहे. हा सामना इंग्लंडच्या द ओव्हल स्टेडियमवर खेळला जात आहे. या सामन्यात दोन्ही डावाच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने चौथ्या दिवशी भारताला ४४४ धावांचं लक्ष्य दिले आहे. या दरम्यान आयसीसीने मोहम्मद सिराज आणि मार्नस लाबूशेनचा एक व्हिडीओ शेअर केला आहे, जो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

भारतीय गोलंदाज मोहम्मद सिराज या सामन्यात चांगल्या लयीत दिसला. सिराजने पहिल्या डावात ४, तर दुसऱ्या डावात १ बळी घेतला. भारताकडून सिराज हा आतापर्यंतचा सर्वात किफायतशीर गोलंदाज ठरला आहे. विकेट्स घेण्यासोबतच त्याने आपल्या वेगानं ऑस्ट्रेलियन फलंदाजांना खूप त्रास दिला. जगातील नंबर वन कसोटी फलंदाज मार्नस लबुशेनला सिराजने सर्वाधिक लक्ष्य केले.

सिराजने दोन्ही डावात लाबुशेनला केले जखमी –

मोहम्मद सिराजने दोन्ही डावात लाबुशेनला आपल्या वेगवान गोलंदाजीचा बळी बनवले. पहिल्या डावात सिराजचा एक चेंडू लबुशेनच्या उजव्या अंगठ्याला लागला. हा चेंडू इतका वेगवान होता की लाबुशेनच्या हातातून बॅटही खाली पडली. लाबुशेनला चेंडू लागल्यानंतर बराच वेळ त्याला वेदना होत होत्या. सिराजने तो चेंडू १४३ किमी प्रतितास वेगाने टाकला. दुखापत फारशी गंभीर नसल्याने थोड्या विश्रांतीनंतर त्याने पुन्हा फलंदाजीला केली.

दुसऱ्या डावातही लाबुशेनच्या हातातून बॅट सुटली –

मार्नस लाबुशेनला दुसऱ्या डावात मोहम्मद सिराजच्या वेगवान गोलंदाजीचा मारा सहन करावा लागला. दुसऱ्या डावात सिराजने डेव्हिड वॉर्नरला बाद करताच लाबुशेन अर्ध्या झोपेतून उठून फलंदाजीसाठी मैदानात आला होता. तेव्हा सिराज डावातील केवळ चौथे षटक टाकत होता. लाबुशेन फलंदाजीला येताच त्याच षटकातील पाचवा चेंडू लाबुशेनच्या अंगठ्याला लागला. चेंडू इतका वेगवान होता की इथेही लाबुशेनच्या हातातून बॅट सुटली.

हेही वाचा – IND vs AUS WTC Final: ऑस्ट्रेलियन चाहत्यांनी ‘इंडिया जीतेगा’च्या दिल्या घोषणा, सोशल मीडियावर VIDEO होतोय तुफान व्हायरल

ऑस्ट्रेलियाने डाव घोषित केला –

ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात हेड आणि स्मिथच्या शतकाच्या जोरावर १२१.३ षटकांत सर्वबाद ४६९ धावा केल्या होत्या. यानंतर प्रत्युत्तरात भारतीय संघाने अजिंक्य रहाणे आणि शार्दुल ठाकुरच्या अर्धशतकांच्या जोरावर ६९.४ षटकांत सर्वबाद २९६ धावा केल्या होत्या. त्यानंतर दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाने अॅलेक्स कॅरीच्या अर्धशतकाच्या जोरावर ८४.३ षटकांत ८ बाद २७० धावांवर डाव घोषित केला.

हेही वाचा – IND vs AUS WTC Final: अंपायरने शुबमन गिलची विकेट ढापली! ट्रॉफी जिंकण्यासाठी कांगारूंचा रडीचा डाव, VIDEO व्हायरल

भारतीय संघाला पहिला धक्का –

तसेच भारतीय संघासमोर ४४४ धावांचे लक्ष्य ठेवले. या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघाला शुबमन गिलच्या रुपाने ४१ धावांवर पहिला झटका बसला. गिल १९ चेंडूत १८ धावा करुन चुकीच्या निर्णयाचा बळी ठरला. त्यानंतर भारतीय संघाने १६ षटकांनंतर १ बाद ७८ धावा केल्या आहेत. त्याचबरोबर रोहित शर्मा ३८ आणि चेतेश्वर पुजारा १९ धावांवर खेळत आहेत.