MS Dhoni in Pony-Tail hairstyle Video Viral: एमएस धोनी कुठेही गेला तरी, तो चाहत्यांपासून लपून राहू शकत नाही. कारण त्याच्या चाहत्यांची संघ्या जगभरात मोठ्या प्रमाणात पसरली आहे. आयपीएल व्यतिरिक्त कोणतेही क्रिकेट खेळत नसतानाही, सीएसकेचा कर्णधार जेव्हाही सार्वजनिक ठिकाणी दिसतो. तेव्हा चाहते सेल्फीसाठी हजर होतात. आता धोनीचा असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये धोनीचा नवीन लूक चाहत्यापासून लपून राहिला नाही. कारण चाहत्यांची नेहमीच त्याच्यावर बारीक नजर ठेवतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

नुकत्याच व्हायरल झालेल्या एका व्हिडीओमध्ये, पाच वेळा आयपीएल विजेता कर्णधार पोनीटेल हेअरस्टाइलमध्ये दिसला आहे. व्हिडीओमध्ये धोनी बसमधून उतरत असताना त्याच्यासोबत बॉडीगार्ड होते. टक्कल करण्यापासून ते मोहॉक करण्यापर्यंत, धोनीने गेल्या काही वर्षांत अनेक केशरचना केल्या आहेत. माही शेवटचा आयपीएल २०२३ च्या फायनलमध्ये खेळताना दिसला होता, जिथे त्याने सीएसकेला पाचव्यांदा विजेतेपद मिळवून दिले.

माहीचा नवा लूक –

एमएस धोनीने २००७ मध्ये भारताचे कर्णधारपद स्वीकारले आणि पहिल्याच वर्षी टी-२० विश्वचषक जिंकण्यात यशस्वी ठरला. गंभीर आणि धोनी यांनी मिळून टीम इंडियासाठी आयसीसी विश्वचषक २०११ चे विजेतेपद पटकावले होते. या दोघांनी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात शानदार अर्धशतके झळकावली. धोनीने नाबाद ९१ धावा केल्या होत्या, तर गंभीरने ९७ धावांची मॅचविनिंग इनिंग खेळली होती.

हेही वाचा – MS Dhoni: ‘मला वाटत नाही…’; माहीच्या नेतृत्वाबद्दल गंभीरचं पुन्हा एकदा विश्वचषकापूर्वी मोठं वक्तव्य, पाहा VIDEO

महेंद्र सिंग धोनीच्या नेतृत्वाखाली, भारताने ३ आयसीसी विजेतेपद जिंकले, ज्यात एकदिवसीय विश्वचषक, टी-२० विश्वचषक आणि चॅम्पियन्स ट्रॉफीचाही समावेश आहे. २०१९ चा विश्वचषक धोनीचा शेवटचा होता, त्यानंतर त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून कायमचा निरोप घेतला.