Murugan Ashwin Amazing Catch Video Viral: तामिळनाडू प्रीमियर लीग २०२३ मधील आठवा सामना मदुराई पँथर्स आणि डिंडीगुल ड्रॅगन्स यांच्यात खेळला गेला. या सामन्यात रविचंद्रनच्या नेतृत्त्वाखाली दिंडीगुलने ७ गडी राखून दमदार विजय मिळवला. मदुराईने प्रथम फलंदाजी करताना १२३ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात दिंडीगुलने १४.१ षटकांत लक्ष्य गाठले. या सामन्यादरम्यान मुरुगन अश्विनने आश्चर्यकारक झेल टिपला. मॉर्गनने हवेत झेप घेत अवघड झेल घेतला. त्याच्या झेलचा अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
वास्तविक एस अरुण दिंडीगुलसाठी तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आला होता. चौथ्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर अरुणने मोठा शॉट खेळण्याचा प्रयत्न केला आणि चेंडू हवेत उंच गेला. हे पाहून मुरुगन आश्विने चेंडूवर नजर ठेवून चेंडूचा पाठलाग केला. त्यानंतर शेवटी चेंडू खाली येताना दिसताच डायव्हिंग करत अवघड झेल घेतला. आता या झेलबद्दल सोशल मीडियावर त्याचे खूप कौतुक होत आहे. याआधीही मुरुगन आश्विने अनेक शानदार झेल टिपले आहेत. या सामन्यात त्याने २.१ षटके गोलंदाजी करताना ११ धावा दिल्या.
या सामन्यात सिचेम मदुराई पँथर्ससाठी जे कौसिकने सर्वाधिक धावा केल्या. त्याने ३४ चेंडूत ४५ धावांचे योगदान दिले. तसेच गुरजपनीत सिंगने सर्वाधिक विकेट्स घेतल्या. त्याने ४ षटकांत १८ धावा देत ३ विकेट्स घेतल्या. त्याचबरोबर दिंडीगुल ड्रॅगनसाठी बाबा इंद्रजितने सर्वाधिक जास्त धावांचे योगदान दिले. त्याने ४८ चेंडूत ७ चौकार आणि ४ षटकाच्या मदतीने नाबाद ७८ धावा केल्या. पी सरवण कुमार आणि सुबोथ भाटी यांनी प्रत्येकी ३-३ विकेट्स घेतल्या.
तामिळनाडू प्रीमियर लीग २०२३ मध्ये आतापर्यंत ८ सामने खेळले गेले आहेत. जर पॉइंट टेबलबद्दल बोलायचे, तर दिंडीगुल अव्वलस्थानी आहे. त्यांनी दोन सामने खेळले आहेत आणि दोन्ही जिंकले आहेत. या संघाने पहिल्या सामन्यात त्रिचीचा गडी राखून पराभव केला होता. यानंतर दुसऱ्या सामन्यात मदुराईचा सात गडी राखून पराभव केला. दिंडीगुलचा नेट रन रेट जास्त चांगला असल्याने ते अव्वल आहेत.