Usman Tariq’s Bowling Action Video Viral : पाकिस्तान सुपर लीगमध्ये शनिवारी कराची किंग्ज आणि क्वेटा ग्लॅडिएटर्स हे संघ आमनेसामने होते. मात्र या सामन्यानंतर कराची किंग्जचा मिस्ट्री स्पिनर उस्मान तारिक सोशल मीडियावर सतत ट्रेंड करत आहे. वास्तविक, उस्मान तारिकने क्वेटा ग्लॅडिएटर्सचा फलंदाज टिम सेफर्टला त्याच्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर बाद केले. त्यानंतर षटकाच्या शेवटच्या चेंडूवर जेम्स विन्सला आपल्या जाळ्यात अडकवले. मात्र, यानंतर पदार्पणवीर उस्मान तारिकची बॉलिंग ॲक्शन चर्चेचा विषय ठरत आहे.
क्वेटा ग्लॅडिएटर्सविरुद्धच्या सामन्यात कराची किंग्जचा फलंदाज टिम सेफर्ट २१ धावांवर फलंदाजी करत होता. कराचीच्या डावातील हे सातवे षटक होते. तारिकच्या हातात चेंडू होता. तो रनअपवर आला आणि भारतीय ऑफस्पिनर आर अश्विनसारखा चेंडू टाकण्यापूर्वी थांबला आणि नंतर चेंडू फेकला. चेंडू ऑफ स्टंपच्या रेषेवर पडला आणि थेट सेफर्टच्या पॅडला लागला. यानंतर क्वेटाच्या क्षेत्ररक्षकांनी एलबीडब्ल्यूचे जोरदार अपील केली आणि अंपायरने आऊट दिले. यानंतर सेफर्टने रिव्ह्यू घेतला. भले चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर पडला होता. पण, तो थेट विकेटवर आदळताना दिसला. या कारणामुळे अंपायरने सेफर्टला आऊट दिले.
उस्मान तारिकची बॉलिंग ॲक्शन चर्चेत –
त्याच षटकातील शेवटच्या चेंडूवर उस्मान तारिकने जेम्स विन्सची शिकार केली आणि यावेळीही तारिक चेंडू सोडण्यापूर्वीच थांबला आणि नंतर त्याने चेंडूला फ्लाइट दिली. या वेळी विन्स विकेटसमोर सापडला. चेंडू सरळ त्याच्या पॅडला लागला. तारिकचा हा चेंडू मधल्या यष्टीच्या रेषेवर पडला होता आणि वेगाने आतमध्ये आला, विन्सची बॅट चेंडूवळ येईपर्यंत चेंडू पॅडला लागला होता. त्यामुळे विन्सची खेळी संपुष्टात आली. तो २५ चेंडूत ३७ धावा करून तो बाद झाला.
आता उस्मान तारिकची विचित्र बॉलिंग ॲक्शन चर्चेचा विषय ठरत आहे. सोशल मीडियावर चाहत्यांचे म्हणणे आहे की, उस्मान तारिकची गोलंदाजी ॲक्शन योग्य नाही. त्यामुळे चाहत्यांनी या मिस्ट्री स्पिनरच्या ॲक्शन आक्षेप घेतला असून ती कायदेशीर नसल्याचेही म्हटले आहे. उस्मान तारिकने टीम सेफर्ट आणि जेम्स विन्सला ज्या प्रकारे बाद केले, त्यामुळे क्वेटा ग्लॅडिएटर्सचे मार्गदर्शक विवियन रिचर्ड्ससह चाहते हैराण झाले. उस्मान तारिकच्या बॉलिंग ॲक्शन वर ते खूश नसल्याचे विवियन रिचर्ड्स यांच्या हावभाववरुन स्पष्टपणे दिसत होते. मात्र, उस्मान तारिकची ही बॉलिंग अॅक्शनवर सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याशिवाय सोशल मीडिया यूजर्स सतत कमेंट करून आपला फीडबॅक देत आहेत.