IND vs SA 2nd T20I Match Updates : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसर्‍या टी-२० सामन्यात भारताला पराभवाला सामोरे जावे लागले होते, पण या सामन्यातही भारताला एक आनंदाची बातमी मिळाली की रिंकू सिंगची बॅट केवळ भारतीय खेळपट्ट्यांवरच नाही तर दक्षिण आफ्रिकेसारख्या खेळपट्ट्यांवरही शानदार चालते. बाऊन्स आणि स्विंगने भरलेल्या विदेशी खेळपट्ट्यांवरही तो दमदार फलंदाजी करताना दिसला. या सामन्यातील रिंकू सिंगचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रिंकू सिंगने मीडिया बॉक्सची फोडली काच –

यादरम्यान रिंकूने त्याच्या खेळीत ९ चौकार आणि २ षटकार मारले. रिंकूच्या बॅटमधून एक असा उत्तुंग षटकार आला, जो सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला. वास्तविक, रिंकूने १९व्या षटकातील शेवटच्या दोन चेंडूंवर दोन षटकार ठोकले. षटकाच्या शेवटच्या चेंडूवर त्याने गोलंदाजाच्या डोक्यावर षटकार मारला, जो थेट मीडिया बॉक्समधील काचेवर जाऊन आदळला. रिंकूच्या या शॉटमुळे मीडिया बॉक्सची काच फुटली. सामन्यानंतर रिंकू सिंगने मागितली माफी.

रिंकू सिंगने बीसीसीआयची मागितली माफी –

इतकंच नाही तर बीसीसीआयशी झालेल्या खास संवादात त्यांनी माफीही मागितली आहे. आता तुम्ही विचार करत असाल की त्याला माफी मागायची काय गरज होती, काल त्याने जबरदस्त षटकार ठोकला. यानंतर मीडिया बॉक्सची शिसे तुटली. याविषयी तारेशी चर्चा झाली तेव्हा तो हसला आणि म्हणाला, ‘मला याबद्दल माहिती नव्हती, मला तुमच्याकडूनच कळले. त्याबद्दल मला खेद वाटतो.’

हेही वाचा – AUS vs PAK Test : पहिल्या कसोटी सामन्यासाठी ऑस्ट्रेलियाची प्लेइंग इलेव्हन जाहीर, उपकर्णधारपदी ‘या’ खेळाडूची लागली वर्णी

२६ वर्षीय खेळाडूने बीसीसीआयशी संवाद साधताना सांगितले की, “मी जेव्हा फलंदाजीसाठी मैदानात आलो, तेव्हा आमच्या तीन विकेट्स पडल्या होत्या. आमच्यासाठी परिस्थिती थोडी कठीण होती. सामना चालू असताना माझी सूर्याभाईंशी चर्चा झाली होती की चेंडू जसा येईल तसा शॉट खेळायचा. सुरुवातीच्या क्षणांमध्ये मी थोडा वेळ घेतला कारण विकेट समजून घेण्यात काही अडचण येत होती. त्यामुळे सुरुवातीच्या षटकांमध्ये मी काही चेंडू खेळले, पण एकदा सेटल झाल्यावर मी मोठे फटके मारायला सुरुवात केली.”

हेही वाचा – IND vs SA 2nd T20 : सूर्यकुमार यादवला बाद केल्यानंतर का काढला बूट? सामन्यानंतर तबरेझ शम्सीने केला खुलासा, पाहा VIDEO

रिंकूशिवाय कर्णधार सूर्यकुमार यादवनेही अर्धशतक झळकावले . सूर्याने ५६ धावांची खेळी खेळली. रिंकू आणि सूर्या यांच्यात ७० धावांची भागीदारी झाली. तिलक वर्मा बाद झाल्यावर रिंकू सिंग फलंदाजीला आला होता. रिंकूने पहिल्याच चेंडूवर चौकार मारत खाते उघडले. रिंकूने या सामन्यात अवघ्या ३० चेंडूत आपले पहिले अर्धशतक पूर्ण केले. रिंकूचा टीम इंडियासोबतचा हा पहिलाच परदेश दौरा आहे, या दौऱ्यात रिंकू सिंगलाही बॅटिंगमध्ये प्रमोट करण्यात आले होते. या संधीचा रिंकू सिंगने चांगला फायदा घेतला.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Video of rinku singh apologizing after smashing the glass of the media box by hitting a six has gone viral vbm
Show comments