Rohit Sharma abusing his teammate on the first day of the WTC final: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात डब्ल्यूटीसीचा फायनल सामना ७ जून पासून लंडनमधील ओव्हल येथे खेळला जात आहे. या सामन्याच्या पहिल्याच दिवशी ऑस्ट्रेलियाने शानदार फलंदाजी करताना ताबा मिळवण्यास सुरुवात केली आहे. पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलियाने ३ गड्यांच्या मोबदल्यात ३२७ धावा केल्या आहेत. दरम्यान, भारतीय कर्णधार रोहित शर्मा संघातील खेळाडूंवर चांगलाच संतापलेला दिसला. त्याने सामन्यादरम्यान खेळाडूंना शिवीगाळ केली. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये रवींद्र जडेजाने चेंडू घेऊन उभा असल्याचे दिसत आहे. यादरम्यान रोहित शर्मा जडेजाजवळ येताना तो खेळाडूंना शिवीगाळ करतो, त्याचा हा आवाज स्पष्टपणे व्हिडीओमध्ये ऐकू येत आहे. यानंतर जडेजा आणि रोहित शर्मा एकमेकांशी बोलतात. त्यानंतर रोहित शर्मा चेतेश्वर पुजाराचे नाव घेऊन काहीतरी बोलतो.
चौथी विकेट घेताना भारतीय गोलंदाजांना फुटला घाम –
या सामन्यात भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. फलंदाजीसाठी उतरलेला ऑस्ट्रेलियन संघाला सुमारे एक तास भारतीय गोलंदाजांनी बांधून ठेवले होते, पण हळूहळू ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांना सूर गवसला. त्यानंतर शानदार फलंदाजी करताना संघाचा डाव सावरला. भारतीय संघाने २५ व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर मार्नस लबुशेनच्या रूपाने ऑस्ट्रेलियाची तिसरी विकेट घेतली होती. त्यानंतर भारतीय गोलंदाजांना चौथ्या विकेटसाठी संघर्ष करावा लागत आहे.
हेही वाचा – IND vs AUS, WTC 2023 Final: ट्रॅव्हिस हेडने रचला इतिहास, ४८ वर्षांनी घडला ‘हा’ अजब योगायोग
यानंतर पहिल्या दिवशी एकूण ८५ षटके टाकली, पण भारतीय गोलंदाजांना चौथी विकेट घेता आली नाही. ट्रॅव्हिस हेड आणि स्टीव्ह स्मिथ यांनी शानदार फलंदाजीचे प्रदर्शन केले. जिथे हेडने वेगवान खेळी खेळली आणि १५६ चेंडूत २२ चौकार आणि १ षटकाराच्या मदतीने १४६* धावा केल्या. त्याचवेळी स्टीव्ह स्मिथने त्याला साथ देताना २२७ चेंडूत १४ चौकारांच्या मदतीने ९५* धावा केल्या आहेत. दोन्ही फलंदाजांनी चौथ्या विकेटसाठी २५१* धावांची भागीदारी केली