Rohit Sharma and wife Ritika dance: भारत आणि ऑस्ट्रेलिया संघातील वनडे मालिकेला आजपासून सुरुवात झाली आहे. या मालिकेतील पहिला सामना मुंबईत खेळला जात आहे. दरम्यान कर्णधार रोहित शर्मा पहिला वनडे सामन्यात सहभागी झाला नाही. कारण रोहित शर्माने पत्नी रितिकाच्या भावाच्या लग्नाला रजा घेतली आहे. या लग्नासाठी रोहित पत्नीसोबत उपस्थित होता. या लग्नात हिटमॅनने पत्नी रितिकासोबत जबरदस्त डान्स केला, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

रोहितने पत्नीसोबत जबरदस्त डान्स केला –

रोहित शर्माने पत्नी रितिकासोबत डान्स फ्लोअरवर जोरदार डान्स केला. रोहितने काळ्या रंगाच्या शेरवानीमध्ये पंजाबी गाण्यावर डान्स केला. दोघांच्या डान्स व्हिडिओला लोक पसंत करत आहेत, जो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

खरंतर, रोहित शर्मा त्याचा मेहुणा कुणाल सजदेहच्या लग्नाला उपस्थित राहण्यासाठी आला होता, त्यामुळे तो मुंबई वनडेसाठी उपलब्ध नाही. आता कर्णधाराच्या डान्सचा व्हिडिओ समोर आला आहे, याआधी रोहित शर्माची पत्नी रितिका सजदेहने तिच्या भावाच्या हळदी समारंभाचा एक सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता.

हेही वाचा – PSL 2023: बाबर आझमचा टी-२० क्रिकेटमध्ये मोठा धमाका! ख्रिस गेलचा ‘हा’ विक्रम मोडला

रोहित शर्माचा मेहुणा कोण आहे?

कुणाल सजदेह हा रितिका सजदेहचा भाऊ आणि क्रिकेटर रोहित शर्माचा मेहुणा आहे. तो सध्या इंग्लंडमधील मँचेस्टर येथील डेलॉइटच्या स्पोर्ट्स बिझनेस ग्रुपमध्ये क्रीडा उपक्रम व्यवस्थापक म्हणून कार्यरत आहे. याआधी त्यांनी नेक्सस कंसल्टिंग ग्रुप- रोटमॅन मध्ये काम केले आहे. कुणालने आपले शालेय शिक्षण मुंबई, महाराष्ट्रातील द कॅथेड्रल आणि जॉन कॉनन स्कूलमधून केले. त्यानंतर एचआर कॉलेज ऑफ कॉमर्स अँड इकॉनॉमिक्स, मुंबई येथून पदवी प्राप्त केली. एचआर कॉलेजमध्ये महाविद्यालयीन जीवनात तो क्रीडा परिषदेचा सदस्य होता.

पहिल्या सामन्यासाठी भारतीय संघांची प्लेइंग इलेव्हन –

शुबमन गिल, इशान किशन (विकेटकीपर), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, केएल राहुल, हार्दिक पंड्या (कर्णधार), रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Video of rohit sharma and wife ritika dancing at kunal sajdehs wedding has gone viral vbm