Rohit Sharma giving surprise to daughter Samaira: भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा सध्या पत्नी रितिका सजदेह आणि मुलगी समायरासोबत लंडनमध्ये सुट्टीचा आनंद घेत आहे. रोहित सोशल मीडियावर सतत फोटो आणि व्हिडीओ अपलोड करत असतो, ज्यामध्ये तो खूप मस्ती करताना दिसत आहे. जागतिक क्रिकेटमध्ये ‘हिटमॅन’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या रोहितने शुक्रवारी त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम पेजवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये तो समायराला सरप्राईज देताना दिसत आहे

.रोहित शर्माने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये तो पत्नी आणि मुलींसोबत लंडनमध्ये फिरत असल्याचे दिसत आहे. व्हिडीओमध्ये रितिका मुलगी समायराला सांगते की तुझ्यासाठी एक सरप्राईज आहे, तुला माहिती आहे का? यावर समायरा नाही म्हणते. त्यानंतर रोहित मुलीला म्हणतो की मलाही माहित नाही, फक्त तुझ्या आईलाच या सरप्राईजबद्दल माहिती आहे. यानंतर दोघेही समायराला ऑस्कर विजेता अॅनिमेटेड फिल्म फ्रोजन पाहण्यासाठी घेऊन जातात. चित्रपट पाहिल्यानंतर मुलगी खूप आनंदी दिसते. वाटेत रोहित मुलीचा हात धरून नाचताना दिसत आहे.

Pat Cummins likely to miss Champions Trophy 2025 due to ankle injury
Pat Cummins : चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी ऑस्ट्रेलियाला धक्का? ‘हा’ स्टार खेळाडू संपूर्ण स्पर्धेला मुकण्याची शक्यता
Michael Clarke slam Cricket Australia for ignoring Sunil Gavaskar in Border Gavaskar Trophy presentation ceremony
Border Gavaskar Trophy : ‘हे अनाकलनीय आहे…’, गावस्करांना…
Yuzvendra Chahal spotted with Mystery Girl amid divorce rumors with wife Dhanashree Verma Photos viral
Yuzvendra Chahal : युजवेंद्र चहल घटस्फोटाच्या चर्चेदरम्यान ‘मिस्ट्री गर्ल’सह कॅमेरात कैद, चेहरा लपवतानाचा फोटो व्हायरल
Pakistan preparations for Champions Trophy slow sport news
चॅम्पियन्स करंडकाची तयारी पाकिस्तानकडून संथगतीने; बहुतेक केंद्रांचे नूतनीकरण अपूर्णच
Rohit Sharma and Virat Kohli included in India squad for Champions Trophy ODIs
रोहित, विराटच्या समावेशाची शक्यता; चॅम्पियन्स करंडकासाठी राहुल, शमी, जडेजाबाबत संदिग्धता
Rohit Sharma Completes 14 Years With Mumbai Indians Franchise Shared Special Video for Hitman
Rohit Sharma: IPL 2025 पूर्वी अचानक मुंबई इंडियन्सला आली रोहित शर्माची आठवण, शेअर केला खास VIDEO; काय आहे कारण?
Martin Guptill Retirement New Zealand Batter Retires From International Cricket Thank Fans and Coach
धोनीला केलं रनआऊट अन् टीम इंडियाच्या वर्ल्डकप विजयाचा हिरावला घास; किवी संघाच्या ‘त्या’ खेळाडूची अचानक निवृत्ती
Champions Trophy 2025 All Venues in Pakistan Lahore Rawalpindi Karachi Are Still Not Ready Tournament Could Shift to UAE
Champions Trophy: पाकिस्तानला चॅम्पियन्स ट्रॉफीची हौस भारी; पण स्टेडियम्स बांधून तयारच नाही, यजमानपद दुबईकडे जाण्याची शक्यता
How Wankhede Stadium Built| History and Significance of Wankhede Stadium Mumbai
Wankhede Stadium Mumbai: मराठी माणसाच्या अपमानातून उभं राहिलं वानखेडे स्टेडियम, मुंबईतील ऐतिहासिक स्टेडियमच्या जन्माची रंजक कहाणी

भारत विरुद्ध विंडीज यांच्यातील पहिला कसोटी सामना १२ जुलैपासून खेळवला जाणार –

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमधील पराभवानंतर टीम इंडियाचे खेळाडू ब्रेकवर आहेत. सर्व खेळाडू वेगवेगळ्या ठिकाणी सुट्टीचा आनंद घेत आहेत. रोहित तीन आठवड्यांच्या सुट्टीनंतर वेस्ट इंडिजला रवाना होणार आहे, जिथे अनेक खेळाडू आधीच पोहोचले आहेत. रोहित लवकरच विंडीजमध्ये टीम इंडियात सामील होणार आहे. दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळण्यापूर्वी भारतीय संघ विंडीजमध्ये सराव सामना खेळणार आहे. या मालिकेतील पहिला कसोटी सामना १२ जुलैपासून सुरु होणार आहे.

हेही वाचा – County Cricket: शेन वॉर्ननंतर आता ‘या’ फिरकीपटूने टाकला ‘बॉल ऑफ द सेंच्युरी’, VIDEO होतोय व्हायरल

डब्ल्यूटीसी फायनलमध्ये रोहित फ्लॉप ठरला –

रोहित शर्माचा विंडीज दौऱ्यासाठी कसोटी आणि एकदिवसीय संघात समावेश करण्यात आला आहे. ३६ वर्षीय रोहित शेवटचा ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या डब्ल्यूटीसी फायनलमध्ये खेळताना दिसला होता. डब्ल्यूटीसी फायनलमध्ये रोहित शर्माची कामगिरी काही खास नव्हती. त्याला दोन्ही डावात अर्धशतकही झळकावता आले नाही. रोहितला विंडीजविरुद्ध फॉर्ममध्ये परतण्याची सुवर्णसंधी आहे.

वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी टीम इंडिया –

रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, ऋतुराज गायकवाड, विराट कोहली, यशस्वी जैस्वाल, अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), केएस भरत (यष्टीरक्षक), इशान किशन (यष्टीरक्षक), आर अश्विन, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, अक्षर पटेल, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, जयदेव उनाडकट आणि नवदीप सैनी

Story img Loader