Rohit Sharma taunting Ravindra Jadeja for a no ball : इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी रवींद्र जडेजाच्या चुकीमुळे नवोदित सर्फराझ खान मैदानावर धावबाद झाल्यानंतर भारतीय कर्णधार रोहित शर्माने आपली कॅप फेकून आपली निराशा व्यक्त केली होती. आता राजकोट सामन्याच्या दुस-या दिवशी रोहितने जडेजावर अशी कमेंट केली, की ऐकून तुम्ही हसू आवरू शकणार नाही. कसोटी सामन्याच्या शेवटच्या सत्रात वारंवार ओव्हरस्टेप केल्याबद्दल जडेजाला नो बॉल दिल्याने रोहितने त्याला फटकारले. आता या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजवर विश्वास दाखवत रोहितने २९व्या षटकात इंग्लंडच्या ओली पोपविरुद्ध डीआरएस करण्याचा निर्णय घेतला. पोपची विकेट मिळाल्यावर रोहित शर्माने इंग्लिश संघावर दबाव टाकण्यासाठी ३०व्या षटकात जडेजाकडे चेंडू सोपवला. मात्र, रोहित जडेजावर नाराज दिसला कारण त्याने जो रूटला गोलंदाजी करताना दोनदा ओव्हरस्टेप केले.

रोहित शर्माने रवींद्र जडेजाला नो बॉलवरुन मारला टोमणा –

रोहितने चेन्नई सुपर किंग्ज आयपीएलमधील कामगिरीशी तुलना करून जडेजाला त्याच्या नो-बॉलबद्दल फटकारले. रोहित गमतीने जडेजाला म्हणाला, ” अरे यार, जड्डू आयपीएलमध्ये तर नो-बॉल टाकत नाही. टी-२० सामना समजून गोलंदाजी कर ना.” या मनोरंजक टिप्पणीने इंटरनेटवर पटकन लक्ष वेधले. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

हेही वाचा – Naushad Khan : आनंद महिंद्रांनी पुन्हा जिंकली सर्वांची मनं, सर्फराझ खानच्या वडिलांना खास ‘गिफ्ट’ देण्याची केली घोषणा

भारताकडे पहिल्या डावात १२६ धावांची आघाडी –

राजकोट कसोटीच्या तिसऱ्या दिवशी इंग्लंडचा संघ पहिल्या डावात ३१९ धावांवर आटोपला. बेन डकेटने संघासाठी १५३ धावांची सर्वात मोठी खेळी खेळली. याशिवाय कर्णधार बेन स्टोक्सने ४१ धावा केल्या. या काळात भारताकडून मोहम्मद सिराजने सर्वाधिक ४ विकेट घेतल्या. सामन्याच्या दुसऱ्या दिवशी वर्चस्व गाजवणारा इंग्लंड तिसऱ्या दिवशी फ्लॉप दिसला आणि दुसऱ्या सत्रातच कोसळला. इंग्लिश संघाने शेवटच्या ५ विकेट अवघ्या २० धावांत गमावल्या. त्यामुळे भारतीय संघाने पहिल्या डावाच्या जोरावर १२६ धावांची आघाडी घेतली.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Video of rohit sharma taunting ravindra jadeja with a no ball in the third test against england has gone viral vbm