Video of Sadeera Samarvikrama taking an amazing catch of Rahmat Shah : श्रीलंका आणि अफगाणिस्तान यांच्यातील एकमेव कसोटी मालिका २ फेब्रुवारीपासून खेळली जात आहे. या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी श्रीलंकेचा यष्टिरक्षक सदीरा समरविक्रमाने हुशारी दाखवत विकेटच्या मागे असा झेल घेतला, ज्यामुळे चाहते थक्क झाले. सदीराचा हा झेल पाहून चाहत्यांना भारताचा स्टार यष्टीरक्षक फलंदाज महेंद्रसिंग धोनीची आठवण झाली. यानंतर सदीरा समरविक्रमाने घेतलेल्या झेलचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
सदीरा समरविक्रमाने घेतला अप्रतिम झेल –
अफगाणिस्तान संघाच्या पहिल्या डावात श्रीलंकेचा यष्टिरक्षक सदीरा समरविक्रमाने रहमत शाहचा अप्रतिम झेल घेतला. सदीराने डावाच्या ४६व्या षटकात हुशारी दाखवली. श्रीलंकेसाठी प्रभात जयसूर्या हे षटक टाकत होता. वास्तविक, चेंडू लेगस्टंपच्या बाहेर जाताना पाहून सदीरा आधीच स्टंपपासून बाहेर गेला. रहमत शाहने हा चेंडू थर्ड मॅनच्या दिशेने खेळून सीमारेषेच्या बाहेर पाठवण्याचा प्रयत्न केला पण सदीराच्या सुरुवातीच्या चालाखीमुळे चेंडू थेट स्टंपच्या मागे त्याच्या हातात गेला.
रहमत शाहची विकेट घेणे श्रीलंकेसाठी खूप महत्त्वाचे होते. अफगाणिस्तानच्या पहिल्या डावात तो सर्वाधिक काळ स्थिरावलेला फलंदाज होता. रहमतने १३९ चेंडूंत १३ चौकारांच्या मदतीने ९१ धावा केल्या. ज्या चेंडूवर रहमतने झेल घेतला तो चेंडू खूपच खाली होता आणि त्याला बाद घोषित करण्यापूर्वी थर्ड अंपायरचीही मदत घेण्यात आली होती. तिसऱ्या पंचाचा निर्णय श्रीलंकेच्या बाजूने लागला. त्यामुळे रहमतला पॅव्हेलियनमध्ये परतावे लागले. सदीरा समरविक्रमाच्या या झेलचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या झेलचे चाहते खूप कौतुक करत आहेत.
हेही वाचा – IND vs NEP : बीड ते ब्लोमफॉन्टीनपर्यंत डंका वाजवणाऱ्या सचिन धसने वडिलांना वाढदिवसानिमित्त दिलं शतकाचं गिफ्ट
सामन्यावर श्रीलंकेची मजबूत पकड –
या सामन्याबद्दल बोलायचे झाले, तर श्रीलंकेच्या संघाने अफगाणिस्तानविरुद्ध आपली पकड मजबूत केली आहे. या सामन्यात प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेला अफगाणिस्तानचा संपूर्ण संघ १९८ धावांत सर्वबाद झाला. पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत श्रीलंकेने एकही विकेट न गमावता ८० धावा केल्या होत्या. त्यानंतर दुसऱ्या दिवशी ४१ षटकांपर्यंत श्रीलंकेने ३ गडी गमावून १८७ धावा केल्या आहेत.