Sam Curran tampering with camera video viral: विश्वचषकाच्या १३व्या सामन्यात इंग्लंडचा सामना अफगाणिस्तानशी होत आहे. दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर खेळल्या जात असलेल्या या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून गोलंदाजी निवडली. प्रथम फलंदाजीला आलेल्या अफगाणिस्तान संघाची सुरुवात चांगली झाली. अफगाणिस्तानच्या सलामी जोडीने पहिल्या विकेटसाठी ११४ धावांची भागीदारी केली. रहमानउल्ला गुरबाजने ८० धावांची स्फोटक खेळी खेळली. दरम्यान या सामन्यात सॅम करन कॅमेरामॅनवर संतापल्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

सॅम करन कॅमेरामॅनवर संतापला –

रहमानउल्ला गुरबाजने फलंदाजी करताना सॅम करनच्या एका षटकाला लक्ष्य केले. सॅम करनच्या या षटकात गुरबाजने २० धावा केल्या, त्यानंतर सॅम करनचा संयम सुटला आणि तो सीमारेषेवर कॅमेरामनशी भिडला. वास्तविक, अफगाणिस्तानच्या डावाच्या ९व्या षटकात रहमानुल्ला गुरबाजने सॅम करनला दोन चौकार आणि १ षटकार ठोकला. सॅम करनच्या या षटकात एकूण २० धावा आल्या. यानंतर सॅम करण आपला संयम गमावताना दिसला.

सॅम करनचा व्हिडीओ झाला व्हायरल –

सॅम करण त्याचे षटक संपल्यानंतर पुढच्या षटकात सीमारेषेवर क्षेत्ररक्षण करायला गेला. तो क्षेत्ररक्षण असताना एक कॅमेरामनने कॅमेर त्याच्या जवळ नेला, पण या अष्टपैलू खेळाडू कॅमेराला धक्काबुक्की करताना दिसला. सॅम करणचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. सोशल मीडियावर अनेक यूजर्स सॅम करनच्या या वागण्यावर टीका करत आहेत.

हेही वाचा – ENG vs AFG, World Cup 2023: रहमानउल्ला गुरबाज आणि इब्राहिम झद्रानमध्ये विक्रमी भागीदारी! अफगाणिस्तानसाठी रचला इतिहास

वर्षातील तिसरी शतकीय भागीदारी –

याशिवाय गुरबाज आणि जद्रान यांच्यातील ही या वर्षातील तिसरी शतकी भागीदारी आहे. या दोघांनी नुकतीच दोनदा २०० हून अधिक धावांची भागीदारी केली होती. ८ जुलै रोजी चट्टोग्राम येथे बांगलादेश विरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात, गुरबाज आणि झद्रान यांनी पहिल्या विकेटसाठी २५६ धावांची भागीदारी केली होता. यानंतर आशिया कपमध्येही या जोडीने पाकिस्तानविरुद्ध २२७ धावांची भागीदारी केली होती. अफगाणिस्तानने बांगलादेशविरुद्ध विजय मिळवला होता, मात्र पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात संघाचा पराभव झाला होता.