WTC 2023 Final India vs Australia: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना खेळवला जात आहे. या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. टीम इंडियाला वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने शानदार सुरुवात करून दिली. त्याने सलामीवीर उस्मान ख्वाजाला शून्यावर बाद केले. या सामन्यात सिराजचे पहिले षटकही मेडन होते. सिराजने विकेट घेतल्यानंतर आयसीसीने त्याचा फोटो ट्विट केला. सिराजचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

या सामन्यात नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजीला आलेल्या ऑस्ट्रेलियन संघासाठी डेव्हिड वॉर्नर आणि ख्वाजा सलामीला आले. यादरम्यान चौथ्या षटकातील चौथ्या चेंडूवर ख्वाजा बाद झाला. सिराजच्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर ख्वाजा यष्टिरक्षक श्रीकर भरतकरवी झेलबाद झाला. तो १० चेंडूत खातेही न उघडता बाद झाला. अशाप्रकारे सिराजने टीम इंडियाला चांगली सुरुवात करून दिली. त्याने पहिल्या ३ षटकात १० धावा देऊन एक विकेट घेतली. यासह एक मेडन ओव्हरही टाकली.

ख्वाजा शून्यावर बाद झाल्यानंतर टीम इंडियाच्या खेळाडूंनी जल्लोष केला. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलचा सामना भारतीय कर्णधार रोहित शर्मासाठी खूप खास आहे. तो त्याच्या कारकिर्दीतील ५० वा कसोटी सामना खेळत आहे. रोहितने आतापर्यंत खेळलेल्या कसोटी सामन्यांमध्ये ३३७९ धावा केल्या आहेत. या कालावधीत त्याने ९ शतके आणि १४ अर्धशतके झळकावली आहेत. यामध्ये रोहितच्या एका द्विशतकाचाही समावेश आहे.

दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन-

भारत: रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, श्रीकर भरत (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, उमेश यादव, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज.

हेही वाचा – IND vs AUS, WTC 2023 Final: रोहित शर्मा विदेशात प्रथमच करतोय कसोटी संघाचे नेतृत्व, जाणून घ्या त्याची वनडे आणि टी-२० मधील कामगिरी

ऑस्ट्रेलिया: डेव्हिड वॉर्नर, उस्मान ख्वाजा, मार्नस लाबुशेन, स्टीव्ह स्मिथ, ट्रॅव्हिस हेड, कॅमेरॉन ग्रीन, अ‍ॅलेक्स कॅरी (यष्टीरक्षक), पॅट कमिन्स (कर्णधार), मिचेल स्टार्क, नॅथन लियॉन, स्कॉट बोलँड.

Story img Loader