Tabraiz Shamsi has taken off his boot after dismissing Suryakumar Yadav : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात मंगळवारी १२ डिसेंबर रोजी टी-२० मालिकेतील दुसरा सामना खेळला गेला. टीम इंडियाचा कर्णधार सूर्यकुमार यादव आणि युवा स्टार रिंकू सिंग यांनी शानदार अर्धशतक झळकावले. मात्र टीम इंडियाचे गोलंदाज त्यांना या सामन्यात विजय मिळवून देऊ शकले नाहीत. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा गोलंदाज तबरेझ शम्सीने ४ षटकात १८ धावा देत एक विकेट घेत शानदार गोलंदाजी केली. त्याने सूर्यकुमार यादवची विकेट घेतली. यानंतर तबरेझ शम्सीने विकेट घेतल्यानंतर अशा प्रकारे सेलिब्रेशन केले, ज्यामुळे त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शम्सीने बूट का काढला?

तबरेज शम्सीने सूर्यकुमार यादवची विकेट घेतल्यानंतर, ज्या प्रकारे बूट काढून सेलिब्रेशन केले, त्याची सर्वत्र चर्चा होत आहे. त्याचा व्हिडीओही सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. काही लोकांना वाटेल की दक्षिण आफ्रिकेत सूर्याचा अपमान झाला आहे. पण आम्ही तुम्हाला सांगतो की विकेट घेतल्यानंतर प्रत्येक गोलंदाजाचा ट्रेडमार्क सेलिब्रेशन असतो. त्याचप्रमाणे विकेट घेतल्यानंतर शम्सी आपला बूट काढून फोन नंबर डायल करण्याचे नाटक करतो. त्यानंतर तो बूट फोनप्रमाणे कानाला लावतो. ही त्याची जुनी स्टाईल असली तरी सध्या त्याची जोरदार चर्चा होत आहे.

तबरेझ शम्सीने सेलिब्रेशनवर दिली प्रतिक्रिया?

या सेलिब्रेशनबाबत शम्सीने सामन्यानंतर प्रतिक्रिया दिली आहे. तो म्हणाला, खास मागणी केल्यामुळे मी अशा प्रकारेल सेलिब्रेशन केले. शम्सी पुढे म्हणाला, त्याने अशा पद्धतीने सेलिब्रेशन करने बंद केले आहे. मात्र सीमारेषेवर उपस्थित असलेल्या मुलांनी त्याच्याकडे विशेष मागणी केली होती. यानंतर जेव्हा त्याने सूर्यकुमार यादवला ५६ धावांवर बाद केले, तेव्हा तो असा आनंद साजरा करताना दिसला. भारताचा डाव १९.३ षटकात १८० पर्यंत मर्यादित करण्यात त्याच्या गोलंदाजीचा मोठा वाटा होता.

हेही वाचा – IND vs SA : दक्षिण आफ्रिकेला रवाना होण्यापूर्वी मोहम्मद शमीने नेटमध्ये गाळला घाम, फलंदाजी करतानाचा VIDEO केला शेअर

टीम इंडियाचा झाला पराभव –

दुसऱ्या टी-२० सामन्यात भारतीय संघाला पाच विकेट्सनी पराभव स्वीकारावा लागला. मालिकेतील पहिला सामना पावसामुळे रद्द झाला होता. दुसऱ्या सामन्यात टॉप ऑर्डर भारतासाठी विशेष काही करू शकली नाही. दोन्ही सलामीवीर खाते न उघडताच पॅव्हेलियनमध्ये परतले होते. यानंतर सूर्याने ५६ धावांची, तर रिंकूने ६८ धावांची नाबाद खेळी खेळली. यानंतर पावसामुळे भारताचा डाव पूर्ण होऊ शकला नाही. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेला १५ षटकांत १५२ धावांचे लक्ष्य मिळाले. जे त्यांनी हेंड्रिक्स आणि मार्करामच्या खेळीमुळे सहज गाठले. दरम्यान या सामन्यात भारतीय गोलंदाज खूपच महागडे ठरले. विशेषत: अर्शदीप सिंग ज्याने दोन षटकात ३१ धावा दिल्या आणि त्याला एकही विकेट मिळाली नाही.

हेही वाचा – AUS vs PAK Test : पहिल्या कसोटी सामन्यासाठी ऑस्ट्रेलियाची प्लेइंग इलेव्हन जाहीर, उपकर्णधारपदी ‘या’ खेळाडूची लागली वर्णी

दोन हजार धावा पूर्ण करणारा सूर्यकुमार हा चौथा भारतीय ठरला –

आक्रमक फलंदाज सूर्यकुमार यादवने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या टी-२० सामन्यात शानदार कामगिरी केली. भारतासाठी टी-२० मध्ये २००० किंवा त्याहून अधिक धावा करणारा तो चौथा फलंदाज ठरला. त्याच्या आधी केएल राहुल (२२६५), रोहित शर्मा (३८५३) आणि विराट कोहली (४००८) आहेत.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Video of tabraiz shamsi taking off his boot after dismissing suryakumar yadav went viral in ind vs sa 2nd t20 vbm
Show comments