Keshav Maharaj and KL Rahul Conversation Video Viral : भारताने तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा ७८ धावांनी पराभव करत वनडे मालिका २-१ ने जिंकली. मात्र, या सामन्यात सर्वाधिक चर्चेत असलेली गोष्ट म्हणजे केएल राहुल आणि केशव महाराज यांच्यातील संवाद. खरं तर, गुरुवारी भारताविरुद्धच्या तिसर्‍या आणि शेवटच्या एकदिवसीय सामन्यादरम्यान दक्षिण आफ्रिकेचा फिरकी गोलंदाज केशव महाराज फलंदाजीसाठी आला, तेव्हा पारलमध्ये ‘राम सिया राम’ हे गाणं वाजवण्यात आलं. आता या घटनेचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दक्षिण आफ्रिकेचा खेळाडू केशव महाराज फलंदाजी करत असो किंवा गोलंदाजी, महाराज जेव्हा जेव्हा अॅक्शनमध्ये असतो तेव्हा हे गाणे वाजवले जाते असे. या सामन्यात महाराज गोलंदाजी करायला आला असतानाही असेच घडले. केशव महाराज फलंदाजी करण्यासाठी यष्टीसमोर आल्यावर भारताचा यष्टीरक्षक आणि कर्णधार केएल राहुल यांच्यात एक मजेदार संवाद झाला.

या संवादाचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. वास्तविक केएल राहुलने केशव महाराजला म्हणाला की, “केशव भाई तुम्ही जेव्हाही मैदानात येता, तेव्हा डीजे ‘राम सिया राम’ हे गाणं वाजवतो.” यावर, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेटर म्हणजेच महाराज हे ऐकून मग हसू लागतो.या दोन्ही क्रिकेटपटूंच्या संभाषणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

हेही वाचा – IND vs SA 3rd ODI : ‘हे शतक त्याच्या कारकिर्दीसाठी…’, सुनील गावसकरांकडून संजू सॅमसनच्या खेळीचे कौतुक

याआधीही केशव महाराज अनेक प्रसंगी भगवंताच्या भक्तीत तल्लीन झालेले दिसला आहे. तो हनुमानाचा भक्त आहे. क्रिकेट विश्वचषक २०२३ मध्ये पाकिस्तानवर रोमहर्षक विजय मिळवल्यानंतर महाराजाने सोशल मीडियावर एक खास संदेश शेअर केला होता. ज्यामध्ये त्याने लिहिले होती की, ‘मी देवावर विश्वास ठेवतो. माझ्या संघाने किती चमकदार क्रिकेट खेळले आणि एक विशेष निकाल. जय श्री हनुमान.’

हेही वाचा – IND vs SA : तिसऱ्या सामन्यात सॅमसन-अर्शदीपची कमाल! भारताची दक्षिण आफ्रिकेवर ७८ धावांनी मात, मालिका २-१ ने जिंकली

सामन्याबद्दल बोलायचे तर, भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना गुरुवारी (२१ डिसेंबर) खेळला गेला. पार्ल येथील बोलंड पार्क येथे झालेल्या सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेचा ७८ धावांनी दणदणीत पराभव केला. त्याचबरोबर भारतीय संघाने तीन सामन्यांची मालिका २-१ अशा फरकाने जिंकली. या सामन्यात टीम इंडियाने नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना संजू सॅमसनच्या शतकाच्या जोरावर २९६ धावांचा डोंगर उभारला होता. प्रत्युत्तरात २९६ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेचा संघ ४५.५ षटकांत २१८ धावांत गारद झाला.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Video of the conversation between keshav maharaj and kl rahul in 3rd odi between ind and sa has gone viral vbm