Video of umpire in Sindh Premier League goes viral : क्रिकेटमधील अनेक अनोखे पराक्रम तुम्ही पाहिले असतील. परंतु आम्ही तुम्हाला जे दाखवू आणि सांगू ते खरोखर अद्वितीय आहे. पाकिस्तानमध्ये खेळल्या गेलेल्या सिंध प्रीमियर लीगमध्ये विचित्र घटना पाहायला मिळाली. खरं तर, स्पर्धेच्या एका सामन्यात, गोलंदाजाने कोणतेही अपील न करता पंचांनी फलंदाजाला आऊट दिले. ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
क्रिकेटच्या नियमांबद्दल बोलायचे तर, मैदानावर उपस्थित अंपायर फलंदाजाला आऊट तोपर्यंत देऊ शकत नाही, जोपर्यंत क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाने विकेटसाठी अपील करत नाहीत. पण इथे काही वेगळेच पाहायला मिळाले. विरोधी संघाच्या गोलंदाजाने किंवा क्षेत्ररक्षकाने विकेटची अपील करायच्या अगोदरच पंचानी फलंदाजाला बाद घोषित केले. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
सिंध प्रीमियर लीगच्या या रंजक घटनेचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये गोलंदाज चेंडू टाकतो आणि चेंडू बॅट्समनच्या पॅडवर आदळतो. चेंडू आदळल्यानंतर थोडासा आवाज येतो, परंतु असे दिसते की चेंडू लेग साइडकडे जात आहे आणि तो आऊट होणार नाही. चेंडू लेग साईडला जात असल्याचे पाहून गोलंदाज त्याच्या डोक्यावर हात ठेवतो. या चेंडूवर गोलंदाज किंवा क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाकडून कोणत्याही प्रकारचे अपील होत नाही, परंतु गोलंदाजाच्या मागे काहीतरी वेगळेच दिसते.
हेही वाचा – IND vs ENG : ‘आधी पॅड की बॅट…’, रवींद्र जडेजाच्या एलबीडब्ल्यू आऊटवरुन निर्माण झाला गोंधळ
गोलंदाजाच्या मागे उभा असलेला अंपायर कोणतेही अपील न होता आऊटसाठी बोट वर करतो, जे पाहून सगळेच हैराण होतात. विकेटनंतर बाद झालेल्या फलंदाजांची प्रतिक्रिया खूपच वेगळी होती. यानंतर फलंदाज विचार करतो की कोणतेही अपील न करता अंपायर आऊट कसे दिले आणि हसू लागतो.