Virat Kohli and Anushka Sharma going to London to listen to Krishna Das’s kirtan: भारतीय क्रिकेट संघाचा स्टार खेळाडू विराट कोहली सध्या सुट्टीवर आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलनंतर भारतीय खेळाडू सुट्टीचा आनंत घेत आहेत. टीम इंडिया १२ जुलैपासून वेस्ट इंडिजविरुद्ध कसोटी मालिका खेळणार आहे. याआधी खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे. कोहली आणि त्याची पत्नी अनुष्का शर्मा सध्या लंडनमध्ये आहेत. नुकतेच कोहली आणि अनुष्का कीर्तन ऐकण्यासाठी पोहोचले होते. त्याचे अनेक व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
खरंतर विराट आणि अनुष्का लंडनमध्ये कृष्णा दास यांच्या कीर्तनात सहभागी झाले होते. कृष्णा दास हे अमेरिकन कीर्तनकार आहेत. ते भक्तिगीतांसाठी ओळखले जातात. विराट आणि अनुष्काने यापूर्वीही अनेक धार्मिक स्थळांना भेट दिली आहे. कोहली आणि अनुष्काने मध्य प्रदेशातील उज्जैन येथे महाकालचे दर्शन घेतले होते. त्यानंतर दोघेही वृंदावनला गेले होते. नुकतेच झालेल्या कीर्तनात सहभागी झाल्याचे त्यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या फोटो आणि व्हिडिओंवर चाहत्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत.
विशेष म्हणजे भारतीय संघ जुलैमध्ये वेस्ट इंडिज दौऱ्यावर जाणार आहे. येथे कसोटी, एकदिवसीय आणि टी-२० सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. ही मालिका १२ जुलैपासून सुरू होणार आहे. दोन्ही देशांदरम्यान पहिला कसोटी सामना खेळवला जाणार आहे. या दौऱ्यात बीसीसीआय टीम इंडियातील अनेक वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती देऊ शकते. आयपीएलनंतर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमुळे खेळाडूंवर कामाचा ताण वाढला आहे. त्यामुळे त्याची काळजी घेतली जाण्याची शक्यता आहे.
हेही वाचा – MPL 2023: कोल्हापूर टस्कर्स आज रत्नागिरीच्या जेट्सशी भिडणार, केटी पहिला विजय नोंदवण्यासाठी सज्ज
कोहली फायनलमध्ये अपयशी ठरला होता –
ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या अंतिम सामन्यात कोहलीने आपल्या फलंदाजीने चाहत्यांची निराशा केली होती. पहिल्या डावात तो दोन चौकारांच्या मदतीने १४ धावा काढून बाद झाला, तर दुसऱ्या डावात त्याने सात चौकारांच्या मदतीने ४९ धावा केल्या. मात्र, चौथ्या डावात धावांचा पाठलाग करताना कोहलीकडून मोठ्या आणि सामना जिंकवणाऱ्या खेळीची अपेक्षा होती, त्यात तो पूर्णपणे अपयशी ठरला.
हेही वाचा – MPL 2023: कोल्हापूर टस्कर्स आज रत्नागिरीच्या जेट्सशी भिडणार, केटी पहिला विजय नोंदवण्यासाठी सज्ज
विराट कोहलीची यंदाची कसोटी क्रिकेटमधील कामगिरी –
यावर्षी कोहलीने आतापर्यंत ५ कसोटी सामने खेळले आहेत. या सामन्यांच्या ८ डावात फलंदाजी करताना त्याने ४५ च्या सरासरीने ३६० धावा केल्या. यादरम्यान त्याच्या बॅटमधून १८६ धावांची शतकी खेळी निघाली आहे. विशेष म्हणजे, कोहलीने आतापर्यंत ऑस्ट्रेलियाविरुद्ध पाचही कसोटी सामने खेळले आहेत, चार बॉर्डर-गावसकर ट्रॉफी आणि एक कसोटी चॅम्पियनशिपचा अंतिम सामना खेळला आहे.