Virat Kohli and Ishan Kishan mimic each other’s walk video: आशिया चषकाचे विजेतेपद पटकावून भारतीय संघाने पुन्हा एकदा एकतेचे दर्शन घडवले आहे. कोलंबो, श्रीलंकेतील आर प्रेमदासा स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात टीम इंडियाने १० गडी राखून ऐतिहासिक विजय नोंदवला. यानंतर जेव्हा भारतीय संघाचे खेळाडू एकत्र आले तेव्हा ते मजा-मस्करी करताना दिसले. त्यांचा सोशल मीडियावर एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये विराट कोहली पुन्हा एकदा त्याच्या ओळखीच्या स्टाईलमध्ये मस्तीच्या मूडमध्ये दिसत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

इशान किशनने केली विराट कोहलीची नक्कल –

व्हायरल व्हिडिओमध्ये दिसत आहे की तिलक, श्रेयस, विराट, गिल आणि पांड्या एकत्र उभे आहेत, त्याच दरम्यान इशान किशन त्यांच्यामधून बाहेर आला आणि विराट कोहलीच्या चालण्याची नक्कल करू लागला. मान उंच करुन तो थोडे अंतर पुढे चालत गेला आणि नंतर परत आला. त्यानंतर विराटने इशान किशनच्या चालण्याची नक्कल केली. विराट दोन्ही पाय फाकून चालू लागताच स्टेडियममधील सर्व प्रेक्षक हसू लागले.

मात्र, विराटने त्याची अशी नक्कल केल्याने इशान किशन लाजला आणि तो विराटला मी असं चालत नाही म्हणताना दिसत आहे. त्यानंतर इशान किशन पुन्हा त्याच पद्धतीने चालताना दिसला. यावेळी त्याने थोडे पुढे जाऊन मान डावीकडे व उजवीकडे वळवली. ज्यावर विराटनेही प्रतिक्रिया दिली. टीम इंडियाच्या खेळाडूंच्या बाँडिंगचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे.

हेही वाचा – Asia Cup 2023: श्रीलंकेला १० विकेट्सनं नमवल्यानंतर रोहित शर्माची प्रतिक्रिया; म्हणाला, ‘विचार केला नव्हता…’

कोहलीने वॉटरबॉय बनून जिंकली होती चाहत्यांची मनं –

याआधी विराट कोहलीचा आणखी एक व्हिडीओ व्हायरल झाला होता, जेव्हा तो बांगलादेशविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात वॉटरबॉय बनताना दिसला होता. या व्हिडीओत विराट कोहली टीम इंडियाच्या खेळाडूंना पाणी घेऊन जाताना मजेशीर हावभाव करताना दिसला होता. त्याचा हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. मात्र, यंदा आठव्यांदा आशिया चषक जिंकल्यानंतर टीम इंडिया आता ऑस्ट्रेलियाविरुद्ध २२ सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या होम सीरिजच्या तयारीला सुरुवात करणार आहे. दोन्ही संघात एकदिवसीय मालिका खेळली जाणार आहे. त्यानंतर ऑक्टोबरमध्ये विश्वचषक होणार आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Video of virat kohli and ishan kishan mimic each others walk after winning the asia cup for the eighth time vbm