Virat Kohli carrying water to team India players video goes viral: आशिया चषक २०२३ मधील सुपर फोर फेरीतील शेवटचा सामना भारत आणि बांगलादेश सामना खेळला जात आहे. हा सामना निव्वळ औपचारिकता आहे. कारण भारत आणि श्रीलंका यांनी आधीच अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित केले आहे. रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दरम्यान विराट कोहलीचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

रोहित शर्माने एकदिवसीय पदार्पणाची कॅप तिलक वर्माकडे सोपवली आहे. विराट कोहलीला विश्रांती देण्यात आली आहे. या सामन्यात टीम इंडियाला आपली बेंच स्ट्रेंथ तपासण्याची उत्तम संधी आहे. त्यामुळे भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये ५ बदल करण्यात आले आहेत. विराट कोहली आज प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर असल्याने खेळत असलेल्या खेळाडूंनी पाणी पुरवण्याचे काम करत आहे.

सामन्यादरम्यान ब्रेक आल्यावर खेळाडूंना पाणी आणि इतर साहित्य घेऊन जातानाचा विराट कोहलीची व्हिडीओ व्हायरल होत आहे. कारण टीम इंडियासाठी पाणी घेऊन जाताना विराट कोहली मजेशीर हावभाव करताना दिसत आहे. त्यामुळे सोशल मीडियावर विराटचा व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे. तसेच चाहतेही मजेशीर कमेंट्स करत आहेत. यानंतर विराट कोहली फक्त क्षेत्ररक्षण करण्यासाठी मैदानावर आला होता.

हेही वाचा – IND vs BAN: रोहित शर्माला सचिन तेंडुलकरचा मोठा विक्रम मोडण्याची संधी, बांगलादेशविरुद्ध कराव्या लागणार फक्त ‘इतक्या’ धावा

बांगलादेशला बसला तिसरा धक्का –

सामन्याबद्दल बोलायचे, तर बांगलादेशला सहाव्या षटकात २८ धावांवर तिसरा धक्का बसला. शार्दुल ठाकूरने अनामूल हकला यष्टिरक्षक केएल राहुलकडे झेलबाद केले. अनामूलला ११ चेंडूत चार धावा करता आल्या. १३ षटकांनंतर बांगलादेशची धावसंख्या तीन गड्यांच्या मोबदल्यात ५८ धावा आहे. सध्या कर्णधार शाकिब अल हसन (१९) आणि मेहदी हसन मिराज (१३) क्रीजवर आहेत.

दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन –

भारत: रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, तिलक वर्मा, केएल राहुल (यष्टीरक्षक), इशान किशन, सूर्यकुमार यादव, शार्दुल ठाकूर, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, प्रसीध कृष्णा, मोहम्मद शमी.

हेही वाचा – Glenn and Vini Child: ग्लेन मॅक्सवेल झाला बाबा, पत्नी विनी रमनने दिला गोंडस बाळाला जन्म

बांगलादेश : तनजीद हसन तमीम, लिटन दास (यष्टीरक्षक), अनामूल हक, शाकीब अल हसन (कर्णधार), तौहीद ह्रदोय, शमीम हुसेन, मेहदी हसन मिराज, मेहदी हसन, नसुम अहमद, तन्झिद हसन शाकिब, मुस्तफिजुर रहमान.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Video of virat kohli carrying water to team india players goes viral in ind vs ban match vbm