Virat Kohli making a superman like entry to attend a photo session : भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात झालेला तिसरा सामना इतिहासाच्या पानात कायमचा लिहिला जाईल. हा एकमेव आंतरराष्ट्रीय सामना होता, ज्यामध्ये दोन सुपर ओव्हर्स खेळल्या गेल्या. या सामन्यापूर्वी अनेक सुपर ओव्हर झाल्या आहेत, पण एकाही सामन्यात दोनदा सुपर ओव्हर पाहायला मिळाली नाही, पण भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात १७ जानेवारीला झालेल्या टी-२० मालिकेतील शेवटच्या एकाच सामन्यात दोन सुपर ओव्हर्स झाल्या. या सामन्याचा निकाल दुसऱ्या सुपर ओव्हर्समध्ये लागला. दरम्यान या सामन्यातील विराट कोहलीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

किंग कोहलीमध्ये संचारला सुपरमॅन –

तिसर्‍या टी-२० सामन्यातील विजयानंतर भारतीय संघ फोटोशूट करत होता. त्यावेळी विराट कोहलीने असे काही केले की तो व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. भारतीय संघाचे सर्व खेळाडू फोटोशूटसाठी पोहोचले होते, मात्र कोहली पोहोचला नव्हता. टीमचे बाकीचे खेळाडू विराट येण्याची आणि फोटोशूट करून घेण्याची वाट पाहत होते. यावेळी कोहलीची वाट पाहत इतर खेळाडू आपापसात गप्पा मारण्यात व्यस्त होते, त्यानंतर विराट अचानक तिथे सुपरमॅनप्रमाणे पोहोचला, ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

भारताचा स्फोटक फलंदाज शिवम दुबेची नजर फक्त विराट कोहलीवर होती. दुबे सतत कोहली कसा आला नाही, हे पाहत होता. मग अचानक विराट कोहली धावत आला आणि आपल्या संघाच्या दिशेने सरकला. कोहलीने आपले दोन्ही हात एखाद्या सुपरमॅनसारखे पसरवले होते, जणू तो हवेत उडत-उडत आला . आता हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. कोहली नेहमीच मैदानात सतत काहीतरी करत असतो, ज्यामुळे तो चर्चेत असतो, आता पुन्हा एकदा कोहलीने असेच काही केले आहे.

हेही वाचा – IND vs AFG 3rd T20 : “मला आठवत नाही की…”, विजयानंतर कर्णधार रोहित शर्माने दिली सुपर ओव्हरबद्दल प्रतिक्रिया

कसा लागला सामन्याचा निकाल?

भारतीय कर्णधार रोहितने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला होती. टीम इंडियाने २० षटकात ४ विकेट गमावत २१२ धावा केल्या. प्रत्युत्तरात अफगाणिस्ताननेही २० षटकांत ६ गडी गमावून २१२ धावा केल्या. यानंतर सामना सुपर ओव्हरमध्ये पोहोचला. अफगाणिस्तानने पहिल्या सुपर ओव्हरमध्ये १६ धावा केल्या. भारताला १७ धावा करायच्या होत्या, पण रोहित शर्मा, यशस्वी जैस्वाल आणि रिंकू सिंग हे मिळून केवळ १६ धावा करू शकले.

हेही वाचा – IND vs AFG : अफगाणिस्तानला हरवून रोहित शर्माने केला मोठा पराक्रम, धोनीच्या ‘या’ विक्रमाशी साधली बरोबरी

यानंतर दुसरी सुपर ओव्हर झाली. यामध्ये भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना ११ धावा केल्या. यावेळी रोहित आणि रिंकूशिवाय संजू सॅमसनने फलंदाजी केली. अफगाणिस्तानला १२ धावांचे लक्ष्य मिळाले. अफगाणिस्तान संघाला केवळ एक धाव करता आली. रवी बिश्नोईने दोन विकेट घेत टीम इंडियाला विजय मिळवून दिला. अशा प्रकारे पहिल्यांदाच टीम इंडियाला एका सामन्यात दोन सुपर ओव्हर खेळावे लागले.