Wahab Riaz throwing rain water on people with his car: पाकिस्तान सध्या जोरदार पाऊस आणि पुराच्या तडाख्यात सापडला आहे. त्यामुळे पाकिस्तानातील जनजीवन विस्कळीत होत आहे. एकीकडे पाकिस्तानातील जनता पाऊस आणि पुरामुळे हैराण झाली असताना, दुसरीकडे वेगवान गोलंदाज वहाब रियाझच्या घाणेरड्या कृत्यामुळे संपूर्ण देश संतप्त झाला आहे. खरं तर, सोशल मीडियावर एक व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे, ज्यामध्ये पंजाब प्रांताचे क्रीडा मंत्री वहाब हे लाहोरच्या पावसाच्या पाण्याने भरलेल्या रस्त्यावर आपल्या वेगवान कारने स्टंट करताना दिसत आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

इतकंच नाही तर व्हिडीओमध्ये तो कारमधून खाली उतरून लाहोरच्या रस्त्यावर मस्ती करताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये तो रस्त्यावर भरलेल्या पाण्याच्या मधोमध वेगात आपली कार चालवतो, ज्यामुळे गाडीच्या शेजारून चालणाऱ्या लोकांच्या अंगावर घाण पाणी उडताना दिसत आहे. पंजाब प्रांताचे क्रीडा मंत्री वहाब यांचे हे कृत्य पाहून यूजर्स त्यांना सोशल मीडियावर खूप ट्रोल करत आहेत.

एका युजर्सने वहाबला नालायक म्हटले आहे. त्याने ट्विटरवर लिहिले की, “वहाब रियाझ कारने लोकांवर पाणी उडवत आहे. इतका नालायक आहे. पब्लिसिटी स्टंट करताना ते स्वतःच त्यांचे वास्तव दाखवतात.”

हेही वाचा – Team India: रिंकू सिंगसाठी आनंदाची बातमी! ‘या’ दौऱ्यासाठी भारतीय संघात होणार निवड, बीसीसीआयच्या सूत्राने दिली माहिती

वहाबचा हा व्हिडीओ त्याच्या एका साथीदाराने कारच्या आतमध्ये बसून काढला आहे. या व्हिडीओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे की, वहाब रियाझ पावसाच्या घाण पाण्याने भरलेल्या रस्त्यावर भरधाव वेगाने कार चालवत आहे, त्यामुळे रस्त्याच्या कडेला चालणाऱ्या लोकांवर घाणं पाणी उडताना दिसत आहे.

दुसर्‍या यूजरने एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यामध्ये त्याने लिहले की, वहाब रियाझ लाहोरमधील पुराच्या पाण्यात आपली इज्जत शोधत होता. आणखी एका यूजरने लिहिले की, “लाहोरचे लोक मुसळधार पावसामुळे त्रस्त आहेत. हा घाणेरडा वहाब रियाझ रस्त्यावर नाटक करण्यात व्यस्त आहे.”

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Video of wahab riaz throwing rain water on people with his car went viral and trolled on social media vbm