Yashasvi Jaiswal’s father leaving for the Kavad Yatra to complete his double century: मुलांनी आपले नाव उज्वल करावे ही प्रत्येक पालकाची इच्छा असते. टीम इंडियाचा युवा फलंदाज यशस्वी जैस्वालने वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात शतक झळकावून आपल्या पालकाचे नाव उज्वल केले आहे. आता तो पहिल्या कसोटीत द्विशतक झळकावतो की नाही याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. आत्तापर्यंत भारताच्या एकाही फलंदाजाला अशी कामगिरी करता आलेली नाही. या दरम्यान सोशल मीडियावर यशस्वी जैस्वालच्या वडिलांचा एक व्हिडीओ व्हायर होत आहे.

२१ वर्षीय यशस्वी जैस्वाल यशस्वी जैस्वाल ३५० चेंडूत १४ चौकारांच्या मदतीने १४३ धावांवर नाबाद आहे. या त्याच्या शानदार खेळीच्या जोरावर टीम इंडियाने दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला, तेव्हा पहिल्या डावात २ बाद ३१२ धावा केल्या आहेत. त्यामुळे भारतीय संघाला १६२ धावांची मोठी आघाडी मिळाली आहे. तत्पुर्वी वेस्ट इंडिजचा संघ पहिल्या डावात केवळ १५० धावांवर आटोपला.

Navri Mile Hitlarla
यश-रेवतीच्या नात्यामुळे सासू-सून पुन्हा समोरासमोर येणार; ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेत पुढे काय घडणार?
ladki bahin yojana money recovery
अपात्र ‘लाडक्या बहिणी’ची रक्कम पुन्हा सरकारजमा
IND vs AUS Pitch Invader At The MCG Tried to Hug Virat Kohli and Dances on Ground in Melbourne Test Watch Video
IND vs AUS: विराटच्या खांद्यावर ठेवला हात अन् मग केला डान्स, मेलबर्न कसोटीत अचानक मैदानात घुसला चाहता; VIDEO होतोय व्हायरल
Vijay Hazare Trophy Mumbai Beat Arunachal Pradesh by 9 Wickets Under Shardul Thakur Captaincy
Vijay Hazare Trophy: शार्दूल ठाकूरच्या नेतृत्वात मुंबईने उडवला अरुणाचलचा धुव्वा; अवघ्या ३३ चेंडूत जिंकला सामना
Jasprit Bumrah Bowled Out Travis Head on Duck and Breaks Anil Kumble Record of Most Wickets At MCG IND vs AUS
IND vs AUS: ऑस्ट्रेलियाचा तारणहार हेड असा झाला त्रिफळाचीत; जसप्रीत बुमराहने नावावर केला अनोखा विक्रम, पाहा VIDEO
Check Mohammad Shami Sania Mirza marriage fact check photo
मोहम्मद शमी आणि सानिया मिर्झा अडकले विवाहबंधनात? व्हायरल फोटोंमुळे चर्चांना उधाण; पण सत्य काय? वाचा
IND vs AUS ICC BCCI and Indian Cricket Team in One Word Australian Cricket Answer Watch Video
VIDEO: ICC पेक्षा BCCI वरचढ? ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी दिली भन्नाट उत्तरं, हेड-स्मिथच्या उत्तराने वेधलं लक्ष
Shreyas Iyer 40 Runs Inning Made Mumbai Win in Low Scoring Match vs Hyderabad Vijay Hazare Trophy
Shreys Iyer: श्रेयस अय्यरची कमाल, ९व्या क्रमांकावर फलंदाजीला आला अन् २० चेंडूत पालटला सामना; मुंबईचा दणदणीत विजय

यशस्वी जैस्वालच्या वडिलांचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये ते आपल्या मुलाचे द्विशतक पूर्ण करण्याची इच्छा व्यक्त करत आहे. कावड यात्रेला निघालेल्या यशस्वीच्या वडिलांनी सांगितले की, संपूर्ण कुटुंबात आनंद आहे. भदोही जिल्हा आनंदात आहे. माझ्या मुलाने द्विशतक झळकावे आणि यूपीचे नाव उज्वल करावे, अशी माझी इच्छा आहे. त्याचे द्विशतक पूर्ण व्हावे, यासाठी मी बाबांच्या धाममध्ये हे व्रत मागणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्याचबरोबर त्याच्या मेहनतीला यश मिळो.

यशस्वी जैस्वालचा क्रिकेटपटू बनण्याचा प्रवास संघर्षमय राहिला आहे –

यशस्वी जैस्वाल लहान वयात मुंबईत आला होता. क्रिकेट खेळण्यासाठी त्याला खूप संघर्ष करावा लागला. अगदी पाणी पुरी सुद्धा विकावी लागली. त्याला कागदाच्या तंबूत राहावे लागले. तो दिवसभर खेळायचा आणि रात्री स्वतः स्वंयपाक करुम पोट भरायचा. १९ वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेत संघाला चॅम्पियन बनवल्यानंतर यशस्वीने रणजी ट्रॉफी, दुलीप ट्रॉफी, इराणी आणि आयपीएलमधील आपल्या उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर सर्वांचे लक्ष वेधून घेतले. त्यामुळेच त्याला टीम इंडियात संधी मिळाली आणि त्याने आता निवडकर्त्यांचा निर्णय योग्य असल्याचे सिद्ध केले.

हेही वाचा – VIDEO: “कायलियन एमबाप्पेचे फ्रान्सपेक्षा भारतात जास्त चाहते”, पीएम मोदींकडून फुटबॉलपटूचे कौतुक

यशस्वी जैस्वालला वेस्ट इंडिजविरुद्धच्या वनडे आणि टी-20 मालिकेसाठी टीम इंडियामध्ये स्थान मिळाले आहे. आयपीएल २०२३ बद्दल बोलायचे झाले, तर त्याने केवळ १३ चेंडूत अर्धशतक झळकावले होते. आयपीएलच्या इतिहासात सर्वात कमी चेंडूत अर्धशतक झळकावणारा तो खेळाडू ठरला आहे. त्याने आयपीएलमध्ये एक शतकही झळकावले आहे. अनेक दिग्गज त्याला भविष्यातील टीम इंडियाचा सुपरस्टार म्हणत आहेत.

Story img Loader