Zaman Khan’s fast yorker bowled Glenn Maxwell’s : बिग बॅश लीग २०२३-२४ चा १२ वा सामना मेलबर्न स्टार्स आणि सिडनी थंडर यांच्यात खेळला गेला. यामध्ये सिडनी थंडरने ५ गडी राखून विजय मिळवला. जमान खानने संघासाठी घातक गोलंदाजी करत ३ विकेट्स घेतल्या. त्याने ग्लेन मॅक्सवेललाही पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. जमानने घातक यॉर्कर चेंडूने मॅक्सवेलला बोल्ड केले. त्याचा व्हिडिओ बिग बॅश लीगने सोशल मीडियावर शेअर केला आहे.

वास्तविक मेलबर्न स्टार्सचा कर्णधार मॅक्सवेल चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आला होता. २६ चेंडूंचा सामना करताना त्याने ३० धावा केल्या आणि तो बाद झाला. मॅक्सवेलच्या या खेळीत ५ चौकारांचा समावेश होता. मॅक्सवेलच्या फलंदाजीदरम्यान सिडनीने तेरावे षटक जमानला दिले. जमानने ओव्हरचा दुसरा चेंडू यॉर्कर टाकला. हा इतका प्घातक चेंडू होता की मॅक्सवेलला तो समजू शकला नाही आणि तो बाद झाला. बिग बॅश लीगने त्याचा व्हिडिओ एक्सवर शेअर केला आहे.

या सामन्यासाठी सिडनी थंडरचा वेगवान गोलंदाज जमान खानला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले. त्याने ४ षटकात २४ धावा देत ३ विकेट्स घेतल्या. मॅक्सवेलसह जमानने कार्टराईट आणि जोनाथन मेर्लो यांनाही पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. बिग बॅश लीग २०२३ मधील जमान खानची कामगिरी पाहिली, तर ती चांगली आहे. त्याने ३ सामन्यात ६ विकेट घेतल्या आहेत. यावेळी तो सर्वाधिक विकेट घेण्याच्या बाबतीत संयुक्तपणे दुसऱ्या स्थानावर आहे. जेसन बेहरेनडॉर्फ सध्या अव्वल स्थानावर आहे. त्याने ७ विकेट घेतल्या आहेत.

हेही वाचा – BBL 2023 : हरिस रौफ ग्लोव्हज आणि पॅडशिवाय फलंदाजीला आल्याचा VIDEO व्हायरल, काय आहे कारण? जाणून घ्या

ब्रिस्बेन हीट सध्या बिग बॅश लीग २०२३-२४ च्या गुणतालिकेत अव्वल स्थानावर आहे. त्याने ४ पैकी ३ सामने जिंकले आहेत. त्याचे ७ गुण आहेत. मेलबर्न स्टार्स तळाला आहेत. त्याने ३ सामने खेळले आहेत आणि तिन्ही सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे.

Story img Loader