पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी दिग्गज वेगवान गोलंदाज शोएब अख्तर सोशल मीडियावर खूप सक्रिय असतो. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान चेंडू टाकण्याचा विक्रम त्याच्या नावावर आहे. शोएबने नुकताच त्याच्या अधिकृत ट्विटर हँडलवर एक व्हिडिओ अपलोड केला असून तो चर्चेचा विषय बनला आहे. रावळपिंडी एक्स्प्रेस म्हणून प्रसिद्ध असलेल्या शोएब अख्तरच्या या व्हिडिओमध्ये असे काय आहे की तो भेटण्यासाठी उत्सुक आहे. यासाठी अख्तरने लोकांची मदतही मागितली आहे. या व्यक्तीला कोणीही शोधावे, असे त्यांचे म्हणणे आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

वास्तविक, शोएब अख्तरने सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये एक म्हातारा त्याच्यासारखाच गोलंदाजी करताना दिसत आहे. म्हातारा ज्या स्पीडने गोलंदाजी करत आहे ते पाहून खुद्द शोएब अख्तरही आश्चर्यचकित झाला आहे. हा व्हिडिओ अपलोड करताना अख्तरने लिहिले, “अरे व्वा! १०० वर्षाचा आणि १००MPH स्पीडने गोलंदाजी करणारा हा वृद्ध खेळाडूला तुम्हाला भेटून मला आनंद होईल. कोणीतरी याचा शोधा घ्या आणि माजी भेट घडवून आणा.”

शोएब अख्तरचा विश्वविक्रम

व्हिडिओतील म्हाताऱ्याचा रनअपही शोएब अख्तरसारखाच आहे. म्हातारा पायजमा कुर्तामध्ये उत्कृष्ट गोलंदाजी करताना दिसत आहे. जगातील सर्वात भयानक वेगवान गोलंदाजांपैकी एक असलेल्या शोएब अख्तरच्या नावावर सर्वात वेगवान चेंडू टाकण्याचा विक्रम आहे. शोएबने १६१.४ किलोमीटर प्रतितास वेगाने गोलंदाजी केली असून हा एक विश्वविक्रम आहे. २००३च्या विश्वचषकात त्याने इंग्लंडविरुद्ध हा विक्रम केला होता.

‘विराट कोहली ११० शतके झळकावणार’- अख्तर

शोएब अख्तरने नुकतेच विराट कोहलीबद्दल भाकीत केले होते की, “भारताचा हा माजी कर्णधार आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ११० शतके झळकावेल. विराटवर आता कर्णधारपदाचे ओझे राहिलेले नाही आणि तो लवकरच मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडेल,” असे अख्तरने म्हटले होते. विराटची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ७५ शतके आहेत, तर क्रिकेटच्या देवाने १०० शतके ठोकली आहेत.

हेही वाचा: Rohit Sharma: “मी फक्त नामधारी कर्णधार…”, रोहित शर्माने आयपीएलमधील मुंबई इंडियन्सच्या संघाबाबत केले मोठे विधान

पाकिस्तानचा माजी क्रिकेटर सईद अन्वरनेही शोएब अख्तरच्या या व्हिडिओवर प्रतिक्रिया दिली आहे. त्याने लिहिले, “१९९९च्या विश्वचषकात तुम्ही गोलंदाजी केल्यासारखीच त्याचा रनअप आणि तीच हाताची अ‍ॅक्शन आहे.” माहितीसाठी, शोएब अख्तर हा केवळ पाकिस्तानचाच नाही तर जगातील सर्वात वेगवान गोलंदाज आहे, त्याने दक्षिण आफ्रिकेत २००३च्या विश्वचषकात इंग्लंडविरुद्ध १६१.३ किमी/तास वेगाने गोलंदाजी केली होती. आजपर्यंत त्याचा विक्रम कोणीही मोडू शकले नाही.त्याच्या कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले तर त्याने ४६ कसोटी, १६३ एकदिवसीय आणि १५ टी२० सामन्यांमध्ये अनुक्रमे १७८, २४७ आणि १९ विकेट्स घेतल्या.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Video oh wow 100 mph at the age of 100 find someone and bring it shoaib akhtar in search of old man avw