भारताविरूद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात ३३८ धावांपर्यंत मजल मारली. स्टीव्ह स्मिथचे दमदार शतक (१३१) आणि मार्नस लाबूशेन (९१) व विल पुकोव्हस्कीची (६२) अर्धशतके यांच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने तीनशे धावांचा टप्पा गाठला. पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलियाचे डावावर वर्चस्व होते, पण दुसऱ्या दिवशी भारतीय गोलंदाजांनी यजमानांना स्वस्तात रोखले. रविंद्र जाडेजाने सर्वाधिक चार बळी टिपले. पण त्याने स्मिथला रन आऊट केल्याची जास्त चर्चा रंगली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

स्टिव्ह स्मिथ आणि मार्नस लाबुशेन दोघे चांगला खेळ करत होते. पण लाबूशेन ९१ धावांवर बाद झाल्यावर स्मिथने एकट्याने बाजू लावून धरली. दुसऱ्या बाजून गडी बाद होत राहिले. अखेर शेवटच्या गड्यापर्यंत डाव आला. अशा वेळी स्मिथने शक्य तितक्या धावा काढण्याचा प्रयत्न केला. हवाई फटके खेळत त्याने धावा जमवायला सुरूवात केली. एका चेंडूवर त्याला दुसरी धाव घेण्याचा मोह आवरला नाही. तो धाव घेण्यासाठी धावला, तर दुसरीकडे सीमारेषेवरून जाडेजा धावत आला. जाडेजाने धावतच चेंडू हातात घेतला आणि स्टंपचा वेध घेत स्मिथला बाद केलं. त्याच्या विकेटसोबत ऑस्ट्रेलियाचा डावही संपला.

आणखी वाचा- IND vs AUS: ‘टीम इंडिया’चा माजी क्रिकेटपटू ऑस्ट्रेलियन मीडियावर भडकला, म्हणाला…

पाहा व्हिडीओ-

आणखी वाचा- IND vs AUS: आज की नारी….!! कसोटी सामन्यात पहिल्यांदाच घडली ‘ही’ गोष्ट

दरम्यान, लाबूशेननंतर सर्व फलंदाजांनी ऑस्ट्रेलियन चाहत्यांची निराशा केली. मॅथ्यू वेड (१३), कॅमेरॉन ग्रीन (०), टीम पेन (१), पॅट कमिन्स (०), नॅथन लायन (०) हे सारे फलंदाज स्वस्तात परतले. मिचेल स्टार्कने फटकेबाजी करत २४ धावा केल्या. जाडेजाने ४, बुमराह व सैनीने २-२ तर मोहम्मद सिराजने १ बळी टिपला.