टीम इंडियाला न्यूझीलंडविरुद्ध टी २० मालिकेत हार पत्करावी लागली. २-१ अशी भारताने ती मालिका गमावली. त्यामुळे कर्णधारपदाची भूमिका पार पाडणारा रोहित शर्मा काहीसा हताश झाला होता. पण भारतात परतल्यावर त्याच्या चेहऱ्यावर पुन्हा एकदा हास्य परतले. त्याचं महत्वाचं कारण रोहित शर्माला अखेरीस आपली चिमुकली समायरा हिला वेळ देता आला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आधी ऑस्ट्रेलिया आणि त्यानंतर न्यूझीलंड दौऱ्यामुळे रोहितला आपल्या चिमुकलीला मनसोक्त खेळता आले नव्हते. रोहितची पत्नी रितिकाने समायराला जन्म दिल्यानंतर रोहित काही दिवसांसाठी आपल्या पत्नी आणि चिमुकलीला भेटायला गेला होता. त्यानंतर त्याला पुन्हा मैदानावर परतावे लागले होते. मात्र आता रितिकाने एक व्हिडीओ शेअर केला आहे.

या बरोरबच रोहितच्या एका चाहतीनेदेखील एक व्हिडीओ शेअर केला आहे. रोहित आपली चिमुकली समायरा हिच्याशी खेळत असल्याचे या व्हिडीओमध्ये कॅप्शन देण्यात आले आहे. त्यात रोहित शर्मा आणि रितिका हिलादेखील टॅग केले आहे.

दरम्यान, न्यूझीलंडमध्ये भारतीय संघ रोहितच्या नेतृत्वाखाली एकदिवसीय मालिकेतील अखेरचे दोन सामने व टी २० मालिका खेळला. त्यातील १ एकदिवसीय सामना भारताने जिंकला. तर टी २० मालिका भारताने २-१ अशी गमावली.