Rohit Sharma Viral Video: भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या एक दिवसीय सामन्यानंतर भारताचा कर्णधार रोहित शर्मा याचा एक व्हिडीओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. आपल्याला माहीतच असेल की, मेव्हण्याच्या लग्नामुळे तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिला एकदिवसीय सामना खेळू रोहित शर्मा शकला नव्हता. म्हणूनच शुक्रवारी वानखेडे येथे ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्याच्या अनुपस्थितीत हार्दिक पांड्याने संघाचे नेतृत्व केले. दुसऱ्या एकदिवसीय सामन्यापूर्वी रोहित त्याच्या भारतीय सहकाऱ्यांसोबत विशाखापट्टणम येथे पोहोचला तेव्हा विमानतळावर चाहत्यांनी त्याचे स्वागत केले. याच वेळी एका चाहत्याला भारताच्या कर्णधाराने चक्क लग्नासाठी प्रपोज केले आहे. याचाच व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर पाहायला मिळत आह .

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

व्हिडीओमध्ये आपण पाहू शकता की रोहित शर्माची वाट पाहत हा चाहता विमानतळावर थांबला होता. रोहित येताच त्याने सेल्फी काढण्याचा प्रयत्न केला. बहुधा यावेळी रोहितही चांगल्या मूड मध्ये असावा म्हणून त्याने गमंतीत त्याला एक गुलाब दिला आणि म्हणाला, “ये लो, आपके लिये” (हे घे, हे तुझ्यासाठी आहे).” तोपर्यंत चाहत्याने त्याचे आभार मानले इतक्यात रोहितने त्याला थेट माझ्याशी लग्न करशील का? असे विचारले.

Video: रोहित शर्माने चक्क चाहत्याला केलं प्रपोज

दुसरीकडे, ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कची विध्वंसक गोलंदाजी आणि सलामीवीर मिचेल मार्श (नाबाद 66) व ट्रॅव्हिस हेडच्या (नाबाद 51) भागीदारीमुळे भारताचा 10 गडी राखून पराभव झाला. पहिला सामना भारताने जिंकला होता त्यामुळे विशाखापट्टणम येथे रविवारी एकदिवसीय मालिकेत 1-1 अशी बरोबरी झाली .गेल्या सामन्यात तीन बळी मिळवणाऱ्या स्टार्कने या सामन्यातही आपली लय कायम राखली. भारताची ही ऑस्ट्रेलियाविरुद्धची तिसरी नीचांकी धावसंख्या आहे.