Viral Video: भारताने आशिया चषक २०२२ मध्ये आतापर्यंत झालेल्या सर्व सामन्यांमध्ये विजयाचा विक्रम कायम राखला आहे. टीम इंडियाने आपला कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानवर पाच गडी राखून विजय मिळवून आपल्या मोहिमेची सुरुवात केली आणि हाँगकाँग विरुद्धच्या सामन्यात 40 धावांनी आघाडी घेत टीम इंडियाने आपला दबदबा कायम ठेवला. या सामन्यांमध्ये रोहित शर्माचे नेतृत्व कौतुकास्पद ठरले मात्र पाकिस्तानचा माजी अष्टपैलू खेळाडू मोहम्मद हाफीजने रोहितच्या पात्रतेवर सवाल करत तो फार काळ कर्णधार म्हणून टिकणार नाही अशी कटू टीका केली आहे. (Asia Cup 2022: रोहित शर्मा ठरला विराट कोहलीवर भारी; हाँगकाँग विरुद्ध विजयानंतर रचला ‘हा’ विक्रम)

मोहम्मद हाफीज, जो आशिया चषक दरम्यान पाकिस्तानच्या पीटीव्ही चॅनेलवर चर्चा सत्रात बोलत असताना त्याने, सामन्यातील रोहितच्या देहबोलीवरून भाष्य करत टीकास्त्र उगारले. हाफिझच्या मते, रोहित शर्माची देहबोली ‘कमकुवत’ आणि ‘गोंधळलेली’ असते. एका व्हायरल व्हिडीओमध्ये हाफिझने म्हणाला की, “रोहित जेव्हा नाणेफेकीसाठी आला तेव्हा तो मला फार घाबरलेला दिसला जो रोहित शर्मा आपण सामन्यात बिनधास्त खेळताना पाहिला आहे, तो आशिया चषकात तरी दिसला नाही.”

(…म्हणून रोहित शर्मावर भडकला गौतम गंभीर; म्हणाला, “ऋषभ पंतला…”)

हाफिज पुढे म्हणतो की, कर्णधार पदाच्या जबाबदारीमुळे रोहित शर्मावर खूप दबाव आहे. यामुळे शर्माला अनेक समस्या येत आहेत. एकतर स्वतःचा फॉर्म बिघडत असताना टीमची जबाबदारी रोहितला झेपत नाही असे दिसतेय. आयपीएलचा हंगाम वाईट गेला त्यानंतर जेव्हापासून रोहित आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळत आहे त्यातही रोहितची कमाल दिसली नाही. अशा अनेक गोष्टी आहेत ज्यामुळे रोहितचा कमी झालेला आत्मविश्वास दिसून येतोय.

पाहा व्हिडीओ

दरम्यान, तिन्ही फॉरमॅटमध्ये पाकिस्तानचे प्रतिनिधित्व करणाऱ्या या अष्टपैलू खेळाडूने रोहितच्या भवितव्याबद्दलही एक धाडसी विधान केले, हाफिज म्हणाला की, रोहित शर्मा आणखी फार वेळ भारताचा कर्णधार राहणार नाही. याविषयी रोहितने स्वतः किंवा निदान भारतीय टीमच्या निर्णयकाने याविषयी निर्णय घेण्याची गरज आहे.

Story img Loader