IND vs SL Shreyas Iyer Angry: दुखापतग्रस्त हार्दिक पांड्याचे पुढील आठवड्यात अंतिम लीग सामन्यात पुनरागमन होण्याची शक्यता असताना, पांड्याला जागा देण्यासाठी श्रेयस अय्यरला प्लेइंग XI मधून काढले जाऊ शकते अशी चर्चा होती. पण गुरूवारी श्रीलंकेविरुद्ध ८२ धावांची दणदणीत खेळी खेळून अय्यरने स्पर्धेतील त्याची आतापर्यंतची सर्वोच्च धावसंख्या गाठली आहे. यापूर्वी अय्यरच्या कामगिरीवर टीका करताना अनेकांनी त्याला शॉर्ट बॉलखेळता येत नाही आणि वेगवान गोलंदाजांसमोर तो अनेकदा बाद झाला आहे असे म्हटले होते.

भारताच्या सातव्या विजयानंतर अय्यरला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पुढील सामन्याच्या तयारीबद्दल विचारले गेले, या सामन्यात वेगवान गोलंदाज असतील ते श्रेयस अय्यरच्या या कमकुवत बाजूचा फायदा घेऊ शकतात, यामुळे तुझ्यासाठी समस्या निर्माण होऊ शकतात का? असा प्रश्न त्याला करण्यात आला होता ज्यावर श्रेयस अय्यरने भडकून “माझ्यासाठी समस्या म्हणजे नेमकं तुम्हाला काय म्हणायचंय?” असा उलट प्रश्न केला.”

ajay devgan
“तो कारमध्ये एक हॉकी स्टिक…”, रोहित शेट्टीने अजय देवगणबाबत केला खुलासा; अभिनेता म्हणाला, “आता मी…”
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
Tula Shikvin Changlach Dhada
भुवनेश्वरी आणि चारुलताच्या गोंधळात अक्षराच वेडी ठरणार; नेटकरी म्हणाले, “शिक्षिका असून सुद्धा…”
Lakhat Ek Aamcha Dada
चांगले वागण्याचे नाटक करून डॅडींचा सूर्याला फसविण्याचा प्लॅन; प्रोमो पाहताच नेटकरी म्हणाले, “तुमचं पोरगं आणि तुम्ही…”
Sanju Samson Revelas Suryakumar Yadav and Gautam Gambhir Support him
Sanju Samson : ‘कारकीर्दीत बरेच चढ-उतार आले, पण…’, शतकी खेळीनंतर संजू सॅमसनने ‘या’ दोन माणसांचे मानले आभार
Police found dead body of a boy in lake but shocked as he suddenly start speaking shocking video
VIDEO: हे कसं झालं? तलावात पडलेला ‘मृतदेह’; पोलिसांनी बाहेर खेचताच अचानक उठून बोलू लागला
KL Rahul Odd Dismissal Video Goes Viral He Gets Bowled Out Between his Legs in India vs Australia A
KL Rahul Wicket Video: असं कोण आऊट होतं??? राहुलची विकेट पाहून चक्रावून जाल, नेमका कसा झाला क्लिन बोल्ड, पाहा व्हीडिओ
Robin Uthappa Statement on CSK Angry on Franchise For Allowed New Zealand Rachin Ravindra to Train at Their Academy
Robin Uthappa: “देशहित आधी आणि नंतर फ्रँचायझीचे खेळाडू…”, रॉबिन उथप्पा CSK वर भडकला, रचिन रवींद्रला कसोटीपूर्वी मदत केल्याबद्दल सुनावलं

श्रेयस म्हणाला, “मी किती पुल शॉट्स मारले आहेत व त्यातले किती चौकार गेले आहेत हे तुम्ही पाहिलंत ना? शॉर्ट चेंडू असला तरी, किंवा ओव्हरपिच केलेला असला तरी काही वेळा थोडं पुढे येऊनच खेळावं लागतं. मी दोन- तीन वेळा अशा गोलंदाजीसमोर खेळू शकलो नाही तर लगेच तुम्ही माझ्याबद्दल ‘तो इनस्विंग बॉल खेळू शकत नाही, बॉल सीमिंग असल्यास तो कट खेळू शकत नाही’ असं म्हणायला सुरुवात केली आहे. “

कालच्या सामन्यात वानखेडेचे मैदान सवयीचे असल्याने शॉर्ट बॉलवर खेळण्यास सुद्धा मदत झाली असे म्हणत श्रेयसने स्पष्ट केले की, “आम्ही खेळाडू या नात्याने कोणत्याही प्रकारच्या बॉलवर खेळण्याचा प्रयत्न करतोच त्यात चुका होऊन बाद होण्याची शक्यता प्रत्येकाच्या बाबत असते. पण तुम्ही लोकांनी असा समज करून ठेवलाय की ‘मी शॉर्ट बॉल खेळू शकत नाही’, मीडियामुळे हा समज पसरला आहे पण मी खेळण्याचा पूर्ण प्रयत्न करतोय.”

श्रेयसने वानखेडेच्या मैदानाबाबत व खेळपट्टीबद्दलही भाष्य केले, तो म्हणाला, “मुंबईत, विशेषत: वानखेडेच्या मैदानात खेळपट्टीवर बाऊन्स अगदी समसमान आहे, इथे इतर खेळपट्ट्यांपेक्षा जास्त उसळी मिळते, मी इथे माझे अनेक खेळ खेळलो आहे. त्यामुळे मला ते कसं हाताळायचं हे माहित आहे. मी जेव्हा काही शॉट्स मारायला जातो तेव्हा थोड पुढे येऊन खेळणं आवश्यक असतं, काही वेळा त्याचा फायदा होतो, काही वेळा नाही, माझ्याबाबत अनेकदा ही पद्धत कामी आलेली नाही त्यामुळेच कदाचित तुम्हाला ही समस्या आहे असे वाटते. परंतु माझ्या मनात मला माहित आहे की कोणतीही समस्या नाही.”

हे ही वाचा<< रोहित शर्माचं स्वार्थी खेळ खेळण्याचा सल्ला देणाऱ्यांना सडेतोड उत्तर, म्हणाला “माझ्यावर दबाव नाही कारण मी शून्य.. “

दरम्यान भारत विरुद्ध श्रीलंका सामन्यातील विजयामुळे भारताने आपल्या नावे विश्वचषकातील सलग सातवा विजय नोंदवला आहे. तसेच उपांत्य फेरीत दाखल झालेला भारत पहिला संघ ठरला आहे.