India vs South Africa Test, Suryakumar Yadav: भारतीय संघाचा मधल्या फळीतील फलंदाज सूर्यकुमार यादव घोट्याच्या दुखापतीमुळे बराच काळ टीम इंडियातून बाहेर आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत त्याला ही दुखापत झाली होती. सूर्याने त्याच्या दुखापतीचा एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यामध्ये तो पायाला प्लास्टर घातलेला दिसत आहे. याबरोबरच तो वॉकरच्या साहाय्याने चालताना दिसत आहे. हा व्हिडीओ शेअर करण्याबरोबरच त्याने लिहिले की, तो लवकरच पूर्णपणे तंदुरुस्त होऊन परतणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

व्हिडीओ शेअर करताना सूर्यकुमार यादवने लिहिले की, “गंभीरपणे एक गोष्ट मी सांगू इच्छितो की, दुखापती कधीच कोणाला होऊ नयेत. ही दुखापत मी माझ्या पद्धतीने हाताळेन आणि लवकरच पूर्णपणे तंदुरुस्त होण्याचे वचन माझ्या चाहत्यांना देतो. तोपर्यंत मला आशा आहे की तुम्ही सर्वजण सुट्टीचा आनंद लुटत आहात आणि दररोज छोट्या छोट्या गोष्टींचा आनंद घेत राहा.” सूर्यकुमारने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये वेलकम चित्रपटातील एक डायलॉगही वाजत आहे. “माझा एक पाय कृत्रिम आहे, मी मोठा हॉकीपटू होतो, पण मी उदयभाईंना चिडवले…” असे या संवादात म्हटले आहे.

नुकत्याच संपलेल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत सूर्यकुमार यादवला ही दुखापत झाली होती. या घोट्याच्या दुखापतीमुळे तो अफगाणिस्तानविरुद्धच्या टी-२० मालिकेत खेळू शकणार नाही. अफगाणिस्तानविरुद्धची टी-२० मालिका ११ जानेवारीपासून सुरू होणार आहे. पीटीआय या वृत्तसंस्थेनुसार, सूर्या आता फेब्रुवारीमध्ये क्रिकेटमध्ये पुनरागमन करू शकतो. बीसीसीआयच्या सूत्राने सांगितले की, ३१ वर्षीय सूर्या पुनर्वसनासाठी एनसीएमध्ये दाखल होणार आहे. आयपीएलपूर्वी फिटनेस तपासण्यासाठी तो फेब्रुवारीमध्ये रणजी ट्रॉफीमध्ये मुंबईकडून खेळू शकतो.

सूर्याला तंदुरुस्त होण्यासाठी सहा आठवडे लागू शकतात

एनसीएच्या वैद्यकीय विज्ञान पथकाने म्हटले आहे की त्याला बरे होण्यासाठी सहा आठवडे लागू शकतात. अशा परिस्थितीत तो अफगाणिस्तानविरुद्धच्या मालिकेसाठी तंदुरुस्त होण्याची शक्यता कमी आहे. अफगाणिस्तानविरुद्धची टी-२० मालिका तीन आठवड्यांनी सुरू होणार आहे. हार्दिक पंड्याही या मालिकेसाठी फिट नाही. अशा परिस्थितीत रोहित शर्माचे टी-२० संघात पुनरागमन होऊ शकते. तसे न झाल्यास रवींद्र जडेजा किंवा जसप्रीत बुमराह अफगाणिस्तानविरुद्धच्या मालिकेत कर्णधार होऊ शकतात.

हेही वाचा: IND vs SA: संजू सॅमसनचे लाखो चाहते का आहेत? दिनेश कार्तिकने केला खुलासा म्हणाला, “संपूर्ण जग त्याचं…”

भारतीय अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्याला २०२३च्या विश्वचषकादरम्यान घोट्याला दुखापत झाली होती, त्यानंतर तो क्रिकेटपासून दूर आहे. हार्दिकने घरच्या मैदानावर ऑस्ट्रेलियाविरुद्धची टी-२० मालिका आणि डिसेंबरमध्ये दक्षिण आफ्रिका दौऱ्याला मुकावे लागले. जानेवारीच्या सुरुवातीला अफगाणिस्तानविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेसाठी तो बरा होईल, अशी अपेक्षा होती. पीटीआयच्या अहवालात असे सुचवले आहे की भारत पुन्हा एकदा अष्टपैलू खेळाडूशिवाय खेळू शकतो. तसेच, असे मानले जात आहे की तो आयपीएल २०२४ मधून देखील बाहेर होऊ शकतो.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Video suryakumar yadav was seen walking with the help of crutches with his leg bandaged said this about returning to the field avw