Virat Kohli And Gautam Gambhir Fight Video: लखनऊ सुपर जायंट्सचा प्रशिक्षक गौतम गंभीर, गोलंदाज नवीन-उल-हक व रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा फलंदाज विराट कोहली यांना आयपीएल २०२३ सामन्यादरम्यान (IPL) आचारसंहितेचा भंग केल्याबद्दल दंड ठोठावण्यात आला आहे.एलएसजी आणि आरसीबी यांच्यातील सामन्यानंतर कोहली आणि गंभीर यांच्यात जोरदार बाचाबाची झाली. १२७ या कमी धावसंख्येचा पाठलाग करताना कोहलीने प्रत्येक विकेटला सेलिब्रेशन करत गंभीरला डिवचल्याने हे भांडण झाले अशा चर्चा आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

याआधी या सामन्यात विराट कोहलीने कृणाल पांड्याचा झेल घेताना ओठांवर बोट ठेवून शांत बसण्याची खूण केली होती. यापूर्वी एम. चिन्नास्वामी स्टेडियमवरील मागील मॅचमध्ये गौतम गंभीरने बंगळुरूच्या प्रेक्षकांना असाच इशारा करत शांत बसण्यास सांगितले होते. यावरूनच किंग कोहली टिंगल उडवत असल्याचे वाटून हे भांडण झाले असावे असा अंदाज आहे.

दोन्ही संघांचे खेळाडू मॅचनंतर हॅन्ड शेक करत होते. यावेळी कोहली आणि गंभीर यांच्यात वाद होताना दिसला. एलएसजीचा गोलंदाज नवीन-उल-हक देखील कोहलीशी वाद घालताना दिसला, ग्लेन मॅक्सवेलने त्याला रोखले. गोंधळाच्या दरम्यान, गंभीर अधिक संतप्त दिसला अखेरीस, दोघांना दोन्ही संघातील खेळाडू, सामना अधिकारी आणि सपोर्ट स्टाफने वेगळे केले.व्हिडिओमध्ये, तुम्ही केएल राहुल, अमित मिश्रा आणि फाफ डू प्लेसिससह प्रत्येकजण दिल्लीत जन्मलेल्या दोन क्रिकेटपटूंना वेगळे करताना पाहू शकता.

विराट, गंभीर व नवीनवर IPL ची कारवाई

आयपीएल समितीतर्फे सांगण्यात आले की, गंभीरने आयपीएल आचारसंहितेच्या कलम २. २१ अंतर्गत लेव्हल २ गुन्ह्याची कबुली दिली आहे आणि त्याला त्याच्या मॅच फीच्या १०० टक्के दंड ठोठावण्यात आला आहे. त्याचप्रमाणे, कोहलीने आयपीएल आचारसंहितेच्या कलम २. २१ अंतर्गत लेव्हल २ गुन्ह्याची कबुली दिली आहे आणि त्याच्या मॅच फीच्या १०० टक्के दंड आकारण्यात आला. दुसरीकडे, नवीन-उल-हकने, सामन्यादरम्यान आयपीएल आचारसंहितेचा भंग केल्याबद्दल त्याच्या मॅच फीच्या ५० टक्के दंड ठोठावण्यात आला आहे.

Video: विराट कोहली व गौतम गंभीरचा वाद

हे ही वाचा<< अनुष्का शर्माच्या अगदी जवळ येत होता फॅन; विराट कोहलीने भडकून एका मिनिटात… Video पाहून चाहतेही थक्क

दरम्यान यापूर्वी एकदा गंभीर आणि कोहली आयपीएल २०१३ मध्ये बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर मैदानावर भिडले होते RCB कोलकाता नाइट रायडर्स (KKR) विरुद्ध खेळत असताना कोहली बाहेर पडला दोघांमध्ये अशीच शाब्दिक बाचाबाची झाली होती. केकेआरच्या रजत भाटियाला हा वाद सोडवावा लागला होता.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Video virat kohli gautam gambhir naveen ul haq fight slapped with massive charges by ipl 2023 during lsg vs rcb match highlights svs