मैदानात खोऱ्याने धावा काढणारा भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली, हा आपल्या फिटनेसबद्दल तितकाच काटेकोर आहे. याआधी विराटने आपले जिममधले व्यायाम करतानाचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले होते. त्यामुळे कोहलीच्या अनेक चाहत्यांना त्याच्या डाएट प्लानविषयी उत्सुकता होती. मात्र, ‘ब्रेकफास्ट विथ चॅम्पियन’ या कार्यक्रमात विराटने आपल्या डाएट प्लानविषयी सर्व चाहत्यांना माहिती दिली आहे. निवेदक गौरव कपूरने विराटला आपल्या खास कार्यक्रमात बोलतं केलं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

अवश्य वाचा – नेहरासोबतच्या ‘त्या’ व्हायरल फोटोवर विराटची प्रतिक्रिया

विराट आपल्या नाश्त्यात ३ अंड्यांचं ऑम्लेट आणि एक अख्खं अंड खातो. यानंतर पपई, ड्रॅगन फ्रूट आणि कलिंगड ही फळ खाऊन विराट एक कप ग्रीन टी घेतो. आतापर्यंत अनेकांनी असा अंदाज बांधला असेल की, बटर चिकन ही विराट कोहलीची सर्वात आवडती डीश असेल. मात्र गेल्या ४ वर्षांमध्ये विराटने बटर चिकनला हातही लावलेला नाहीये. सराव करुन झाल्यानंतर विराट आपल्या दुपारच्या जेवणात ग्रिल्ड चिकन, कुस्करलेले बटाटे, पालकाचा एखादा पदार्थ आणि अन्य भाज्या खातो. यानंतर रात्रीच्या जेवणात विराट सी-फूड खातो.

अवश्य वाचा – Virat Kohli: धोनी आणि माझ्यामध्ये अतूट नाते – कोहली